थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालु आहे अस म्हटलं तर वावग ठरणार नाही;महाराष्ट्रातील बड्या नेत्याच बोट नेमकं कोणाकडे?

थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालु आहे अस म्हटलं तर वावग ठरणार नाही;महाराष्ट्रातील बड्या नेत्याच बोट नेमकं कोणाकडे?

पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनसे अध्यक्षांनी अलिबागमध्ये पत्रकार बांधव आणि स्थानिक पदाधिकारी, नेत्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यभरातील भूमिपुत्रांच्या जमिनींवर सुरू असलेले परकीय आक्रमणाबद्दल सवाल उपस्थित करत सावधतेचा इशारा दिला.”पायाखाली जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरीक नाहीत. मला कल्पना आहे की पैशांची गरज आहे. तुमची जमीन आहे. तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे. ती विकायची नाही विकायची हा तुमचा प्रश्न आहे.

मात्र त्याचा तुम्हाला योग्य मोबदला मिळतोय का? या जमिनी कुणाच्या घशात जात आहेत हे बघायला हवं असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे यांनी राजकीय नेत्यांवरही निशाणा साधला. “केंद्र सरकारचा प्रोजेक्ट येतोय.

एक रुपयाने घेतो आणि हजार रुपयाने राज्य किंवा केंद्र सरकारला विकतोय. भूमीपुत्राचे आहेत ना ते पैसे? ते पैसे न मिळता देशोधडीला लागणार असाल तर काय होईल, हाताखालच्या जमिनी जाताहेत. अशाने उद्या कुठच्या पुढच्या पिढ्यांचा विषयच संपून जाईल,” अशी भितीही मनसे अध्यक्षांनी यावेळी बोलुन दाखवली.”तुम्ही भूमिपुत्र, महाराष्ट्रात जन्माला आलेले.

या हिंद प्रांतात पाहिलं तर संपूर्ण प्रांतावर सर्वांनी राज्ये केली. पण इथं राज्य केलेला माणूस मराठा आहे. मराठ्यांचं राज्य आहे. तिथल्या जमिनी बाहेरचे लोक घेतात. रायगड जिल्ह्यापुरतं नाही. ठाणे, पालघर, रत्नागिरी, सर्वत्र पोखरताहेत तुम्हाला. जमिन भुसभुशीत असतील तर घुशी होतात. खडकामध्ये नाही होतं.

“आज जे कोणी दलाल फिरतात त्यांना सांगणं आहे. तुम्ही तुमच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. बर्बाद झालेलं पुण्याजवळचं हिंजवडी. एक्स्प्रेसवे झाला, जमिनी विकले गेले, उद्ध्वस्त झाला तिथला माणूस…” अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं गांभीर्य तुम्ही ठेवलं पाहिजे. ज्या ज्या तालुक्यात गावांत आहात, तिथल्या तरुणांसोबत बोललं पाहिजे. जमिनीचे व्यवहार करता त्यांच्याशी बोलले पाहिजे, उद्योग तुमचे पाहिजेत, तिथं नोकऱ्या कसल्या करताय? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *