त्या मुलांच्या त्रासामुळे माझ्या मुलाने शाळा सोडली,पुणे अपघातानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीच ट्विट चर्चेत

त्या मुलांच्या त्रासामुळे माझ्या मुलाने शाळा सोडली,पुणे अपघातानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीच ट्विट चर्चेत

पुणे

पुण्यातील कल्याणीनगर मधील कार अपघातात दोघांना जीव गमवावा लागला. नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवली आणि बाईकवरील दोघांना धडक दिली. त्यामध्ये एक तरूण व एका तरूणीचा जीव गेला. या घटनेनंतर पोलीस आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेनंतर सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.

केवळ पुण्यात नव्हे तर राज्यभरात याचे पडसाद उमटले असून राजकीय नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणात रोज नवनवे अपडेट समोर येत असून आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे याची पत्नी सोनाली तनपुरे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं असून त्याचीच चर्चा सुरू आहे.

या अपघात प्रकरणातील काही मुलं आणि सोनाली तनपुरे यांचा मुलाग एकाच वर्गात शिकत होते. त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता, असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहीले. त्या मुलांमुळे माझ्या मुलाला शाळादेखील सोडावी लागली. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असेही सोनाली यांनी नमूद केले.

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोनाली तनपुरे यांनी एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, पण अप्रत्यक्षरित्या त्यांचा रोख पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाकडे असल्याचे पोस्टवरून स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *