जोपर्यंत उरुऴी कांचन – जेजुरी रस्त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही : आण्णा महाडिक

जोपर्यंत उरुऴी कांचन – जेजुरी रस्त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही : आण्णा महाडिक

पुणे

शिंदवणे येथील राज्यमार्ग क्र. ११७ या राज्यमार्गाचे डांबरीकरणाचे पुर्ण काम जानेवारी २०२२ पर्यंत पुर्ण करण्यात येईल असे P. W. D विभागाने आणि संबंधित कंत्राटदाराने ग्रामपंचायतीस कळविले होते. परंतु डिंसेबर २०२१ चालु झाला तरी या मार्गाचे कामही चालु झाले नाही.

आपल्या सर्वांचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवस्थानाकडे या मार्गाने असंख्य लोक प्रवास करत असतात. उरुळी कांचन मार्गे सासवडला जाणारया या महामार्गाचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे हि वारंवार विनंती करुनही संबंधित विभाग याकडे कानाडोळा करत आहे.

याच्या निषेधार्थ शिंदवणे गावचे मा. सरपंच श्री आण्णा महाडिक आणि त्यांचे सहकारी यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

जोपर्यंत उरुऴी कांचन – जेजुरी रस्त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे शिंदवणे गावचे माजी सरपंच आण्णा महाडिक यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *