ख़ाकी  वर्दीने जपली माणुसकी

ख़ाकी वर्दीने जपली माणुसकी

वाघापुर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वात मोठा चौक असणारा वाघापुर-सिंगापुर चौफुला.दि.१८ वार रविवार या दिवशी वाघापुर याठिकाणी एक अनोळखी महिला आढळुन आली.

सदर माहिती जेजुरी पोलिस स्टेशन ला मिळाल्यानंतर माळशिरस बीट चे बीट अंमलदार मुत्तेनवार यांनी त्याठिकाणी येउन चौकशी केली असता सदर महिलेने आपले नाव शुभांगी वाघमारे असल्याचे सांगीतले व पत्ता सातारा असे सांगीतले सदर महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० असुन सदर महिलेस पुर्ण माहितीही व्यवस्थित देता येत नव्हती.

त्यामुळे माळशिरस बीट चे अंमलदार यांनी महिला पोलिसांसहित सदर महिलेस पुढील उपचारासाठी ससुन रुग्णालय पुणे याठिकाणी पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *