खळबळजनक वक्तव्य!!!!!                       संजय राऊतांनी रश्मी ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या..

खळबळजनक वक्तव्य!!!!! संजय राऊतांनी रश्मी ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या..

पुणे

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिला. ज्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निर्णयानंतर ठाकरे गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यामध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप केला होता. यावर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचं हे कारस्थान आहे. मात्र लवकरच संजय राऊत यांचा भंडाफोड करणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे. रत्नागिरीत खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

त्याचबरोबर याबद्दल पुढे बोलताना त्यांनी ‘सामना’चे संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नीला शिवीगाळ करत होते. सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नेमणूक झाल्यावर राऊत शिवीगाळ करत होते, असं खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊत हे शिवसेनेत राहून राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करतात, असा आरोप नेहमी केला जातो. रामदास कदम यांनी यावरून जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे मुळात शिवसैनिकच नाहीत, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *