पुणे
सांगली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. नालसाब मुल्ला यांच्या राहत्या घराजवळ शहरातल्या 100 फुटी जवळ ही घटना घडली.
राहत्या घराजवळ अज्ञातांनी हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले होते.
हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.