पुणे
सततच्या भांडणाला कंटाळुन एका दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे.खासगी कर्ज फेडण्यासाठी त्यांनी जमीन विकली होती.त्यावरून दोघांमध्ये सतत खटके उडायचे.याच उद्रेकातुन दोघांनी टोकाचं पाऊल उचललं.कळंब तालुक्यातील नायगावमध्ये ही घटना घडली.
दीक्षित कुटुंबातील पती-पत्नीने रविवारी रात्री राहत्या घरातील पत्र्याखालील लोखंडी अडुला एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठवले.प्रकाश वसंत दीक्षित(वय ३० वर्षे) आणि अश्विनी प्रकाश दीक्षित(वय २७ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत.त्यांच्या पश्चात आई,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
लोकांचे खाजगी कर्ज फेडण्यासाठी ४ एकरपैकी दीड एकर जमीन विकली म्हणुन प्रकाश आणि अश्विनी यांच्यामध्ये रोजच भांडण व्हायचे,असं प्रकाश यांच्या आई रतन दीक्षित यांनी सांगितलं.या प्रकरणी शिराढोण पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत कोणी तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही.