खळबळजनक !!!!  जगात धुमाकुळ घालणार्या “या” व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला

खळबळजनक !!!! जगात धुमाकुळ घालणार्या “या” व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला

पुणे

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता. त्यानंतर कोरोना राज्यात पसरला होता. कोरोनाचा कहर कमी होत असतानाच आता पुण्यात दोन नव्या खतरनाक व्हायरसची एंट्री झालीय.

जगात धुमाकूळ घालणाऱ्या झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात सापडलाय तर शहरात पहिल्यांदाच जॅपनीज इन्सेफेलायटीसचा रुग्णही सापडलाय.वावधन परिसरातल्या एका 67 वर्षीय रुग्णाला झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्याच्यावर जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्यामुळे महापालिकेसाठी राज्य आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर गेल्यात.. झिका व्हायरस खतरनाक का आहे पाहुयात.झिका हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. या आजारात 80% रुग्णांमध्ये लक्षणं आढळत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे ही लक्षणं आढळलात. झिका आजार संसर्गजन्य नाही. पण फक्त झिकानं पुणेकरांची चिंता वाढवलेली नाही.

पुण्यात पहिल्यांदाच जॅपनीज इन्सेफेलायटीसचा रुग्ण आढळून आलाय. वडगाव शेरी इथल्या 4 वर्षांच्या मुलाला जेईची लागण झालीय. जेई हा एक प्रकारचा विषाणूजन्य मेंदूला होणारा संसर्ग आहे. त्याला मेंदूज्वर असेही म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *