खळबळजनक ! “छत्रपती संभाजीनगर” नामांतराचा स्टेटस ठेवल्यामुळे “या” गावात मुस्लिम युवकांचा तरुणावर हल्ला; कुटूंबियांनाही केली मारहाण

खळबळजनक ! “छत्रपती संभाजीनगर” नामांतराचा स्टेटस ठेवल्यामुळे “या” गावात मुस्लिम युवकांचा तरुणावर हल्ला; कुटूंबियांनाही केली मारहाण

पुणे


औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे राज्यभरात स्वागत करण्यात आले. मात्र छत्रपती संभाजीनगर नामांतराचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे,20 ते 25 मुस्लिम युवकांनी तरुणावर घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात ही घटना घडली आहे.

रुपेश गायकवाड असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून घरावर दगडफेक काचाही फोडल्या आहेत. ही घटना रात्री 11 ते 12 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सिरसाळा येथील रुपेश गायकवाड यांनी आपल्या मित्राने ठेवलेले छत्रपती संभाजीनगर नावाचे व्हाट्सअप स्टेटस आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून ठेवले होते. हे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर रात्री 11 ते 12 च्या दरम्यान गायकवाड यांच्या घरावर ओळखीच्या 13 आणि अज्ञात 10 ते 15 लोकांनी हल्ला केला.

या हल्ल्यात गायकवाड यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची तोडफोडही करण्यात आली.याप्रकरणी रुपेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये उमेर मोईन शेख, शहीद आक्रमखा पठाण, सय्यद अजीज अनिस, शेख अख्तर मोईन, मुखिद पाशा मणियार, अरबाज उर्फ बबु अलवार शेख, सय्यद अजीज जुबेर, शेख साबीर गफार, नेहाल तांबोळी, सय्यद शाबाज, नेहाल इनामदार, सलीम अली इनामदार आणि इतर आठ ते 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *