खळबळजनक !!!!! गुप्तधनासाठी महिला मांत्रिकाकडे सारखाच लावायची तगादा मग काय मांत्रिकाने काढला तिचा काटा

खळबळजनक !!!!! गुप्तधनासाठी महिला मांत्रिकाकडे सारखाच लावायची तगादा मग काय मांत्रिकाने काढला तिचा काटा

कोल्हापूर

गुप्तधनासाठी वारंवार तगादा लावत असल्याने मांत्रिकाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील शुक्रवार पेठ येथे उघडकीस आली आहे. आरती सामंत असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे, तर नामदेव पोवार असे हत्या करणाऱ्या आरोपी मांत्रिकाचे नाव आहे. याप्रकरणी करविर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करविर पोलिसांनी आरोपी नामदेव पोवारला अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत.आरती सामंतचा मृतदेह शुक्रवारी पाडळी खुर्द येथील एका शेतात आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच करविर पोलिसांनी घटनास्थळी धाव मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरु केला.आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच मयत महिलेची कॉल हिस्ट्री आणि अन्य तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले.

आरोपी नामदेव हा राधानगरी तालुक्यातील जोगेवाडी येथील रहिवासी आहे.पोलिसांनी आरोपीची गठडी वळत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरती ही सतत गुप्तधन काढून दे असा तगादा नामदेवकडे लावत होती.

यामुळे आरोपीने तिचा काटा काढला.पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, करविरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि सायबर शाखेने संयुक्तपणे तपास यंत्रणा राबवत काही तासातच आरोपीला जेरबंद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *