कायदा माझ्या बापाने लिहिलाय; माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा

कायदा माझ्या बापाने लिहिलाय; माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा

मुंबई

शिवसेना नेते विनायक राऊत,भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना थेट कायद्याची भाषा केली आहे.ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे हे नेते उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती.

प्रक्षोभक भाषण प्रकरणी सुषमा अंधारे यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी कायद्याच्या भाषेतच प्रतिक्रिया दिली आहे.माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मला अजिबात आश्चर्य वगैरे काहीच वाटलं नाही. मी या सगळ्या गोष्टींसाठी मेंटली प्रीपेड होतेच. हे सगळं अपेक्षित आहे.

मला नोटीस आली तर नक्की जाईन असंही अंधारे म्हणाल्या.जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना अशा प्रकारेच दंड शाही दाखवली जाईल. 153 अ नुसार हा गुन्हा दाखल झाला असून, माझ्याकडे अजूनही रीतसर प्रत आली नाही.मी जे केलं ते नक्कल नाही. मोदीजींनी जे सांगितलं तेच मी माझ्या भाषणात बोलले. राज ठाकरे माझ्यापेक्षा जास्त अशा नकला करतात असं म्हणत अंधारे यांनी भाषणाबाबत खुलासा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *