ओबीसी आरक्षणासाठी भाजपतर्फे पैठण येथे चक्का जाम

ओबीसी आरक्षणासाठी भाजपतर्फे पैठण येथे चक्का जाम

औरांगाबाद : भाजपच्या वतीने ओबीसी आरक्षण निकालाविरुद्ध राज्यभर चक्का जाम आंदोलनाचे आयोजन केले होते. त्याचाच भाग म्हणून पैठण येथील भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शहरात आंदोलन केले.

महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे आरक्षण आघाडी सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे रद्द झालेले आहे. आघाडी सरकार हे ओबीसीच्या मुळावर उठलेले आहे हे फक्त भाषण करतात व ओ बी सी चा वापर करून घेतात समाजाला शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव आघाडी सरकारचा आहे. तरी सरकारने त्वरित आयोग नेमून न्यायालयासमोर बाजू मांडावी व ओबीसीला मिळालेले आरक्षण पुर्वी प्रमाणे द्यावे या करिता चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस लक्ष्मण औटे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सुरज लोळगे, तालुका अध्यक्ष डॉ सुनिल शिंदे , वैदकिय सेल अध्यक्ष डाॅ शांतीलाल राका, शहराध्यक्ष शेखर पाटील, न.प.उपाध्यक्ष महेश जोशी, योगेश सोलाटे, दत्तात्रय सोरमारे, तालुका सरचिटणीस विजय चाटुपळे, भाऊसाहेब बोरुडे, नगरसेवक बंडु आंधळे, बाळासाहेब माने, सुनिल रासने, आप्पासाहेब सोलाट, रघुनाथ इच्छय्या, विजय ठाणगे, सुरेश गायकवाड,दाजी आंबेकर, विजय आचार्य, शाम पंजवानी, गणी बागवान, रणजित नरवडे, रणविर नरवडे, सतीष आहेर, संतोष बढे, सिध्दार्थ परदेशी, तिरुप परदेशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *