आजपासुन यवत-भुलेश्वर-माळशिरस-आंबळे-सासवड या मार्गावर पीएमपी बससेवा होणार सुरु

आजपासुन यवत-भुलेश्वर-माळशिरस-आंबळे-सासवड या मार्गावर पीएमपी बससेवा होणार सुरु

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील प्रवाशी तसेच विद्यार्थी यांची जसा एसटी कामगारांनी संप पुकारला आहे तशी ससेहोलपट सुरु होती परंतु पीएमपी च्या रुपाने या भागातील प्रवाशी,कामगारवर्ग तसेच विद्यार्थी यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की आजपासुन यवत-भुलेश्वर-माळशिरस-आंबळे-सासवड या मार्गावर पीएमपी बससेवा होणार सुरु होणार आहे.

आज सकाळी १० वाजता श्री क्षेत्र भुलेश्वर याठिकाणी पीएमपी बसचे आगमन होणार असुन त्याठिकाणी बसची पुजा करुन ही बस या मार्गावर धावणार आहे.

आजपासुन बससेवा सुरु होणार असली तरी आज फक्त उद्घाटनासाठी बस येणार असुन १ मार्च पासुन नियमित बससेवा चालु होणार आहे.

ही बस सुरु होणार असल्याने प्रामुख्याने शाळा तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच कामगारवर्ग व माळशिरस,टेकवडी,आंबळे,राजेवाडी या गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असुन पीएमपीचे आभार मानण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *