अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक, चालक आणि लाभार्थी कोण हे सांगावं : किरीट सोमय्या

अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक, चालक आणि लाभार्थी कोण हे सांगावं : किरीट सोमय्या

मुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधिक कंपनी, कारखाने आणि विविध आस्थापनांवर आज आयकर विभागानं छापेमारी केली. या कारवाईवरुन अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यावर आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक, चालक आणि लाभार्थी कोण हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी अजित पवारांना दिलंय.

अजित पवार हे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी राजकारण करत आहेत. पण त्यांनी अर्थकारणावर बोलावं. किती कारखाने घेतले? किती भागधारक आहेत? असा सवालही सोमय्या यांनी यावेळी केलाय. मी जरंडेश्वर कारखान्याचा सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. खरा मालक, चालक आणि लाभार्थी अजित पवारांना माहिती आहे, असा दावा सोमय्यांनी केलाय. तसंच अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीनं विकत घेतल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

अजित पवार यांनी तुरुगांत असलेल्या जरंडेश्वर कारखान्याच्या मालकाशी काय संबंध आहेत हे स्पष्ट करावं. गुरु कमोडिटी यांना कारखाना खरेदीसाठी कुणी मदत केली? ओमकार बिल्डरला पैसे कुणी दिले? जरंडेश्वर कारखाना 40 वर्षासाठी लिजवर दिला. अजित पवार आणि शरद पवार यांना माझा सवाल आहे की शेतकऱ्यांचे किती कारखाने आपल्याकडे आहेत ते सांगावं. घोटाळा लपवण्यासाठी वेगळी दिशा दिली जात आहे. संजय राऊत, मिलिंद नार्वेकरांकडून अजित पवारांनी शिकावं. दारामागून ईडीच्या कार्यालयात दंडाची रक्कम भरली, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *