पुरंदर पुरंदर तालुक्यातील पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसास्थापन सेवा संघ शाखा पुरंदर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी 22 जुलै पासून काम बंद आंदोलन चालू करण्यात आले
Maharashtra City: पुणे
राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, सोशल मीडिया आढावा बैठक
जेजुरी जेजुरी येथे पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक विद्यार्थी आणि सोशल मीडिया पदाधिकारी आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व
मंगेशराव ढमाळ यांची पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी मंगेशराव ढमाळ यांची पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपाध्यक्षपदी तथा प्रहार बारामती लोकसभा प्रतिनिधीपदी लोकनेते, प्रहार चे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यमंत्री, बच्चू
“मासुम”ने जपली माणुसकी
पुरंदर माळशिरस(ता.पुरंदर) कोव्हीड-१९ संपूर्ण जगाला हादरवले आहे.आतापर्यंत दोन लाटा आल्या आणि आता तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यातच सातत्याने लावले जाणाऱ्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. या काळात समाजात खूप लोकांच्यानोकऱ्या गेल्या.खूप कुटुंबातील कमावते व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. शेतीमालाला ही भाव मिळत नाही.मजुरीकरणाऱ्या महिला पुरुषांना काम मिळत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.त्यामुळे घरांमध्ये ताण तणाव,हिंसा वाढलेली दिसत आहे आणि म्हणूनचमहिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासुम संस्थेने पुरंदर तालुक्यातील वंचित घटकांना किराणा किट वाटप केले आहे. साधारण ५०० लोकांना प्रत्येकी ११०० रुपयांचं किट वाटप केले आहे. त्यामध्ये एकल महिला,कुष्ठरोग असणाऱ्याव्यक्ती, आदिवासी,कातकरी, तृतीयपंथी व्यक्ती, देवदासी, वीटभट्टी कामगार व ज्या व्यक्तींना रेशनकार्ड नाही, भटक्याजातीजमाती, हिंसापीडित महिलांचा समावेश केला आहे.एकूणच मागील वर्षी लॉक डाऊन झाला की वेगवेगळ्या स्तरातूनमदत झाली परंतु यावर्षी तसे झाले नाही म्हणून काही लोकांना खूप चणचण भासत होती. त्यामुळे ज्यांना किराणा मिळाला त्यांनी सांगितले की, मासुमने खूप चांगली मदत केली.किराणा भरपूर होता.खूप वेळेवरमदत झाली, घरात खायला काहीच नव्हते,मासुमचे कामखऱ्या गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. मासुमने घरोघरी जाऊनकिराणा वाटप केले हे खूप चांगले काम आहे.जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा मदत केली नाही पण संस्थेने मदत केलीकाही महिलांच्या डोळ्यात पाणी आले.अशा ज्यांना किराणा वाटप केले त्यांच्या प्रतिक्रिया होत्या.
नायगाव येथे पार पडला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चा शाखा उद्घाटन समारंभ
पुरंदर नायगाव(ता.पुरंदर) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचाशाखा उद्घाटन समारंभ आज नायगाव येथे संपन्न झाला. यावेळी मा.विजयदादा कोलते, प्रा.दिगंबर दुर्गाडे सर, मा.मयुरदादा जगताप, पुष्कराज भैय्या जाधव, अजिंक्य भैय्याटेकवडे,राहुलजी गिरमे, संदेश पवार,संदीपजी चिकणे, संतोष कोलते,सौरभजी कुंजीर, विजयजी कुंजीर, राजेंद्र बापुधुमाळ,प्रकाशनाना कड, गणेश ढोले,चेतन जाधवराव, भानुदास कोलते सर,प्रदीप खेसे,नवनाथ वाघले, घनश्यामवाघले,सदानाना खेसे, दत्ताभाऊ कड,किरणजि साळुंखे,दिलीपजी शेंडकर, संभाजी आबा चव्हाण, संतोष गाडेकर, महादेवशेंडकर, हरिदास खेसे सर,अनिल शेंडगे,सागर होले, राहुल कड, विकास फडतरे,नानासो कड,गोकुळजी यादव, नवनाथयादव, व सर्व तालुका पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते नायगाव ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्हॅक्सीन घेणे कोणावरही बंधनकारक नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व भारत सरकारच्या निर्देशानुसार कोणताही अधिकारी किंवा डॉक्टर तुम्हालाकोरोनाची लस किंवा कोणतीच लस घेण्याकरीता जबरदस्ती करु शकत नाही. तुम्हाला लस घ्यावयाची नसेल तर तो निर्णय घेण्याच्या अधिकार तुमचा आहे. ज्या नागरिकांना जबरदस्तीने, खोटे बोलून, फूस लावून किंवा पूर्ण माहिती न देता लस घेण्यास भाग पाडले असेल तर त्यानागरिकांना नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार असल्याचा उच्च न्यायालयाचा निकाल. पिडीत नागरिकांना प्रत्येकी १ कोटी रुपये तात्पुरती नुकसान भरपाईची मानव अधिकार सुरक्षा परिषद व इंडियन बारअसोसिएशनची मागणी. नवी दिल्ली नागरिकांना दिशाभूल करुन किंवा जबरदस्तीने लस घेण्यास लावणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुनपिडीत नागरिकांची फसवणूक करुन त्यांच्या मुलभूत मानवी हक्कांचे व घटनादत्त अधिकारांचे उल्लंघन झाल्याप्रकरणीप्रत्येक १ कोटी रुपये अंतरीम नुकसान भरपाई शासनाने द्यावी व ती रक्कम आरोपींकडून वसूल करावी अशी मागणी मानवअधिकार सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव रशीद खान पठाण व इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. निलेश ओझा यांनी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेस अनेक त्रास भोगावे लागतआहेत. या काळात ‘आयवरमेक्टीन’ सारखी अत्यंत प्रभावी, दुष्परीणाम विरहीत, स्वस्त व सगळीकडे उपलब्ध असलेलीऔषधे असतांना काही लस निर्माता कंपनीच्या माफियांनी काही भ्रष्ट अधिकारी, मिडीया यांना हाताशी धरून सत्यपरिस्थीती लोकांना कळू न देता घातक दुष्परीणाम असणाऱ्या व अजूनपर्यंत ज्यांची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी (Third Phase Trial) चे परिणाम येणे बाकी आहेत त्या लसींशिवाय पर्याय नाही असा खोटा बनाव निर्माण करण्याचा प्रयत्नकेला. या संदर्भात अमेरिकेची प्रसिद्ध डॉक्टरांची संस्था Front Line Critical COVID-19 Care Alliance (FLCCC) आणिइंग्लंडमधील डॉक्टरांची संस्था British Ivermectin Recommendation Development Panel (BIRD) यांनी त्यांचेसंपूर्ण पुरावे देवून ‘जागतिक आरोग्य संघटना World Health Organization (WHO)’ यांचा खोटेपणा उघडकीसआणला आहे. या आधीसुद्धा व्हॅक्सीन माफीया बिल गेटस यांच्या बिल अँड मिलींडा गेटस फॉउंडेशनद्वारे अनाधिकृत व्हॅक्सीनची चाचणीकरून 8 मुलींचा मृत्यू केल्याबद्दल सीबीआय (C.B.I.) मार्फत चौकशी करण्याकरीता राज्यसभेच्या Parliamentary
रिपाइं (A) दौंड शहर व तालुक्याच्या वतीने दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त व रिपाइं (A) च्या वर्धापन दिनानिमित्त 100 झाडांचे वृक्ष रोपण
रिपाइं (A) दौंड शहर व तालुक्याच्या वतीने दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त व रिपाइं (A) च्या वर्धापन दिनानिमित्त राजगृह बुद्ध विहार, शासकीय हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल, ख्रिस्ती
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस तर्फे आशा वर्कर,पोलिस पाटील,आरोग्य कर्मचार्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन केले सन्मानित
सासवड महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरच्यावतीने पुरंदर तालुक्यातील महिला पोलीस पाटील व महिला ग्रामसेवक तसेच आशा वर्कर यांना कोरोना योद्धासन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी निरीक्षक सौ भारतीताई शेवाळे, पुणे जिल्हानिरीक्षक कविता आल्हाट, प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री माणिकराव झेंडे पाटील, अॅड. गौरी कुंजीर माजी सभापती अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विजयरावजी कोलते मा.उपाध्यक्ष कृषीसंशोधन परिषद, विराज काकडे मा. जिल्हा परिषद सदस्य ,वंदना जगताप ,अॅड कला ताई फडतरे ,युवक अध्यक्षपुष्कराज जाधव, विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार, सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचेकार्याध्यक्ष विजय कुंजीर यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने करण्यात आले होते.
गावच्या कन्येसाठी एकजुटला गाव
पुरंदर- नायगावगावच्या कन्यासाठी एक हात मदतीचा गौरी श्रीकांत शितोळे रा .उरुळी कांचन ता .हवेली जि. पुणे येथे राहणारी ही गरीब कुटुंबातील गौरी ब्रेन ट्यूमर सारख्या
जेजुरी पोलिसांची धडक कारवाई : ५००० लिटर गावठी हातभट्टी बनविण्याचे कच्चे रसायन केले नष्ट
पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या राजेवाडी येथील गावठी दारु (हातभट्टी) बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भट्टी जेजुरी पोलिसांनी धडक कारवाई करुन फोडली आहे. ओंकार उर्फ ओमश्या शिवा