पुणे मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी जेजुरी मधून धालेवाडी- कोथळे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची बऱ्याच दिवसांपासून अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली होती. संबंधित रस्त्याच्या दुरुस्ती साठी पुणे
Maharashtra City: पुणे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जेजुरीमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन.
शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे: जयदीप बारभाई मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.अजितदादा पवार साहेब यांचे वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जयदीपभैय्या बारभाई मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जेजुरी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यातआलेले आहे. मागील एक ते दोन महिन्यांपासून जेजुरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या चिकन गुनीया ,गोचिड ताप, डेंग्यूयासारख्या आजारांमुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊनमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २२ जुलै रोजी जयमल्हारसांस्कृतिक भवन जेजुरी येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरामधील नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी वऔषधोपचार करण्यात येणार आहे. या शिबीरमध्ये येणाऱ्या रुग्णांना चहा, बिस्किट व फलाहार अशी संपूर्ण मोफत व्यवस्था आयोजकांमार्फत केलेली आहे. तरी जेजुरीतील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिरात सहभागी होऊन आपली मोफत तपासणी करून घ्यावी अश्याप्रकारचे आवाहन जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जयदीप भैय्या बारभाई मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आलेआहे.
“मिशन ऑक्सिजन”काळाची नितांत गरज-संतोष जगताप
पुरंदर संजय कोरडे, संतोष जगताप,लोककवीराजेंद्र सोनवणे यांच्या पुढाकारातून सुरू झालेले मिशन ऑक्सिजन हे वृक्षसंवर्धन अभियान ही काळाची नितांत गरज असून ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलीआहे.याच्या सारखे आपले सामाजिक अपयश दुसरे नसावे!असे परखड प्रतिपादन सासवड राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोषएकनाथ जगताप यांनी केले आहे. मिशन ऑक्सिजनच्या माध्यमातून साई हायटेक नर्सरी सिंगापूर व एपेक्स डायग्नॉस्टिक च्या वतीने सोनोरी मल्हार गड येथेआंबा,चिंच,व कंदब,अशी बहुवर्षीय झाडे लावण्यात आली. येणाऱ्या काळात मल्हार गड परिसरात एक लाख झाडे नुसती लावणे नव्हे तर ती जगवण्याचे “मिशनऑक्सिजन चे उद्दिष्टआहे. या प्रसंगी मिशन ऑक्सिजनचे संचालक श्री सतीश शिंदे, किस्मत इनामदार,संजय कुंभारकर ,संजय कोरडे,चेतन जगताप, मनिषा मंडलिक, योगेश दातार, सुनिल किरदत, संदिप जाधव, विकास काळे,व सोनोरी ग्रामस्थ यांनी झाडे लावण्या साठी सहकार्य केले
पुरंदर तालुक्यात विजेचा लपंडाव
शेतकरी त्रस्त पुरंदर पुरंदर तालुक्यातील बहुतांशी गावात सध्या लाईटचा लपंडाव चालू आहे. प्रामुख्याने बेलसर, साकुर्डे, तक्रारवाडी, वाळुंज, निळूंज, खानवडी या गावांमध्ये सध्या वेळेवर विद्युत पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी, लघुउद्योग आणि लसीकरणकेंद्रांवर विनाकारण ताण येत आहे. सद्यस्थितीला खरीप हंगाम बहरात असताना शेतीपंपाची लाईट दिवसा असतानाचलाईट ची दुरुस्ती आणि इतर कामे केली जातात त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत. बेलसर, साकुर्डे, तक्रारवाडी, वाळुंज,निळूंज, खानवडी या गावांना कृषी पंपाची वीज नियमित चालू असते.दररोज स्विचऑपरेट करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी काम करीत असतात, परंतु हे स्वीच ऑपरेट करताना वेळेवर स्वीच ऑपरेटहोत नाहीत. त्यामुळे लाईट वेळेवर न येणे बहुसंख्य वेळा विद्युत पुरवठा मध्येच खंडित होणे अशा अडचणी समोर येतआहेत. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता महावितरणचे कर्मचारी कुठलीही दाद देतनाहीत.स्विच सिंगल फेज चा थ्रीफेज सप्लायहि वेळेवर जोडला जात नाही. दररोज अर्धा ते एक तास उशिरा सप्लाय चालूहोतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिसरामध्ये महत्त्वाचा व्यवसाय म्हणून शेती हा आहे. शेतीसाठी लाईट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याच बरोबर सर्वचलसीकरण केंद्रावर ऑनलाईन सिस्टीम द्वारे फॉर्म भरले जातात. त्यालाही लाईटच्या अडचणीमुळे अनेक समस्यांना तोंडद्यावे लागत आहे. एकीकडे वसुलीसाठी पुढे सरसावलेले महावितरण दुसरीकडे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी अव्वलदिसत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या महावितरण बद्दल नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे.
ख़ाकी वर्दीने जपली माणुसकी
वाघापुर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वात मोठा चौक असणारा वाघापुर-सिंगापुर चौफुला.दि.१८ वार रविवार या दिवशी वाघापुर याठिकाणी एक अनोळखी महिला आढळुन आली. सदर माहिती जेजुरी
उद्या होणार कॉंग्रेसतर्फे बोंबाबोंब आंदोलन
सासवड केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गँस यांच्या दरवाढीचा तसेच खाद्यतेले यांचे वाढलेले बाजारभाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणार्या त्रासाच्या विरोधात पुरंदर तालुका कॉंग्रेस कमीटीच्या
शिववसंपर्क अभियानांतर्गत बैठक संपन्न
दि.18 जुलै रोजी अभियानाचे सत्यवान उभे यांच्या हस्ते होणार उद्घाटन बारामती प्रतिनिधि: कल्पना जाधव शिवसेनेच्या गाव तेथे शाखा पोहचवून सभासद नोंदणी करून प्रत्येक शाखेवर जावून दि.12 जुलै ते 24 जुलै 2021 दरम्यानशिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवून हे रयतेचे राज्य असल्याची अनुभूती जनसामान्यांना करून देण्यासाठी माळेगाव(ता.बारामती) याठिकाणी बारामती तालुका महिला संघटक सौ.कल्पना जाधव (काटकर) यांच्या नेतृत्वाखालीतालुक्यातील महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिवसेना बारामती तालुकाप्रमुख विश्र्वास मांढरे, माळेगाव खुर्द शाखा प्रमुख नितीन काटे यांचे मोलाचेमार्गदर्शन लाभले. या बैठकीत महिला ध्येय धोरणांची माहिती देण्यात आली. यावेळी सारीका आटोळे, जोस्ना सोलनकर, राजश्री पवार, संगिता शिंदे, ताई अवघडे, सायली मोरे, अश्र्विनी सावंत, सुनिता अडागळे, प्रविणा सस्ते, निता कुचेकर, मिनाक्षी जाधव, सारिका खोमणे, अनिता जगताप, योगिता वाईकर इ. महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला दि.18 जुलै रोजी शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार आहे. संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांच्या हस्ते उद्घाटन होणारआहे. यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख ऍड.राजेंद्र काळे,जिल्हा प्रमुख रमेश कोंडे व महिला संघटक संपर्क प्रमुखशालीनीताई देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न
पुणे खेड घाटाच्या पायथ्याशी झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची लक्षणीयउपस्थिती होती. या कामाचे खरे श्रेय हे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आहे. मी फक्त कर्तव्य म्हणून हा प्रकल्प पूर्णकरण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खेडघाटाचे लोकार्पण या शेतकऱ्यांच्याहस्ते करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता असे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगीतले. त्यानुसार दत्तात्रय कोरडे, देवराम थिगळे, दशरथ थिगळे, तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे यांच्या हस्ते हा लोकार्पणसोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार श्री. दिलीपअण्णा मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे, तालुकाध्यक्षश्री. कैलास सांडभोर, सभापती श्री. विनायक घुमटकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. संध्याताई जाधव, युवती अध्यक्ष आशातांबे कांचन ढमाले, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, विजय डोळस, दिलीप मेदगे, अरुण चांभारे, बाबा राक्षे, विलास कातोरे, बाळशेठ ठाकूर, रामदास ठाकूर, दादा इंगवले, सुभाष होले, नवनाथ होले, अरुण थिगळे, धैर्यशील पानसरे, मनीषा सांडभोर व अन्य पदाधिकारी, तुकाईवाडी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदीउपस्थित होते.
पिडीत कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा देणार:दौलतनाना शितोळे
पुणे दौंड तालुक्यातील पाटस येथील रामोशी समाजातील दोन तरुणांची निर्घुन हत्या झाली होती याच्या निषेधार्थ दौंडतहसील कार्यालया समोर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यातआले होते ही निषेध सभा यशस्वीरित्या संपन्न झाली असून जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी उठवलेलाआवाज महाराष्ट्र शासना पर्यंत पोहोचवू आसे आश्वासन दौंड तहसीलदार यांनी दिले आहे. पाटस प्रकरणातील अनेक गुन्हेगार आरोपी यांना आटक केली आहे काही संशयित आरोपी फरारच आहे त्यांना तात्काळआटक करावी व मोक्याअंतर्गत कारवाई करावी तसेच ही केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालावी यासाठी जय मल्हार क्रांतीसंघटना पाठपुरावा करणार व पिडीत कुटूंबाला न्याय मिळेपर्यंत जय मल्हार लढा देणार, तसचे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यामध्ये रामोशी-बेरड समाजातील युवकांना आणि निराधार बांधवांनाअशा प्रकारचा अन्याय सहन करावा लागत आहे राजकीय व प्रस्थापित लोकांकडून रामोशी-बेरड समाजाची जाणीवपूर्वककुचंबना केली जात आहे तरी या सर्व घटनांचा विचार करून रामोशी-बेरड समाजाला ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत संरक्षणमिळावे यासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आवाज उठवून व शासन दरबारी पाठपुरावाकरण्यात येणार असल्याची माहिती जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षलोकनेते.मा.श्री.दौलतनाना शितोळे साहेब यांनी आपल्या भाषणातून दिली आहे. तसेच या निषेध सभेला वंचित बहुजन आघाडी व वडार समाज पाटस ग्रामपंचायत यांच्या वतीने पदाधिकारी उपस्थितराहून जाहीर सक्रिय पाठिंबा दिला आहे. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
“कोविड काळात गावपातळीवर पोलिस पाटलांचे खुप मोठे योगदान : अजित पवार” मुख्यमंत्री सहायता निधीस मदत,पुणे जिल्हा पोलिस पाटील संघाचा स्तुत्य उपक्रम
मुंबई पुणे जिल्हा गावकामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने १३ लाख ३२ हजार रुपयांचा धनादेश कोविड १९ च्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे