रिपाइं (A) दौंड शहर व तालुक्याच्या वतीने दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त व रिपाइं (A) च्या वर्धापन दिनानिमित्त 100 झाडांचे वृक्ष रोपण

रिपाइं (A) दौंड शहर व तालुक्याच्या वतीने दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त व रिपाइं (A) च्या वर्धापन दिनानिमित्त राजगृह बुद्ध विहार, शासकीय हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल, ख्रिस्ती

Read More

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस तर्फे आशा वर्कर,पोलिस पाटील,आरोग्य कर्मचार्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन केले सन्मानित

सासवड महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरच्यावतीने पुरंदर तालुक्यातील महिला पोलीस पाटील व महिला ग्रामसेवक तसेच आशा वर्कर यांना कोरोना योद्धासन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी निरीक्षक सौ भारतीताई शेवाळे, पुणे जिल्हानिरीक्षक कविता आल्हाट, प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री माणिकराव झेंडे पाटील, अॅड. गौरी कुंजीर माजी सभापती अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विजयरावजी कोलते मा.उपाध्यक्ष कृषीसंशोधन परिषद, विराज काकडे मा. जिल्हा परिषद सदस्य ,वंदना जगताप ,अॅड कला ताई फडतरे ,युवक अध्यक्षपुष्कराज जाधव, विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार, सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचेकार्याध्यक्ष विजय कुंजीर यांच्या हस्ते देण्यात आला.  या कार्यक्रमाचे आयोजन पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने करण्यात आले होते.

Read More

गावच्या कन्येसाठी एकजुटला गाव

पुरंदर- नायगावगावच्या कन्यासाठी एक हात मदतीचा गौरी श्रीकांत शितोळे रा .उरुळी कांचन ता .हवेली जि. पुणे येथे राहणारी ही गरीब कुटुंबातील गौरी ब्रेन ट्यूमर सारख्या

Read More

जेजुरी पोलिसांची धडक कारवाई : ५००० लिटर गावठी हातभट्टी बनविण्याचे कच्चे रसायन केले नष्ट

पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या राजेवाडी येथील गावठी दारु (हातभट्टी) बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भट्टी जेजुरी पोलिसांनी धडक कारवाई करुन फोडली आहे. ओंकार उर्फ ओमश्या शिवा

Read More

स्वाभिमान सप्ताहानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुरुजनांचा सन्मान सोहळा

पुरंदर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीआयोजित अजित स्वाभिमान सप्ताह दुसरा दिवस सासवड शहरातील पुरंदर हायस्कूल, वाघिरे हायस्कूल, कन्याप्रशाला,शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल,गुरुकुल विद्यालयातील दहावीतील  प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंतविद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान सोहळा कार्यक्रम मा.माणिकराव झेंडे पाटील अध्यक्षपुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी करोनाच्या या कसोटीच्या काळात चांगल्यप्रकारे आभास करून उज्वल यश संपादन केले.सासवड व पुरंदरतालुक्यातील मुले अभ्यासात कमी पडत नाही आज निकाल पाहता सर्व प्रथम तीन क्रमांक हे मुलींनीच पटकावले याचामुलांनी विचार करावा लागेल. त्याचबरोबर मुलींना शिक्षणात काही अडचण आल्यास त्यांना योग्य ती मदत केली जाईलअसे यावेळी बोलताना झेंडे पाटील म्हणाले . शाळेतील काही गरीबमुलांना ऑनलाइन साठी मोबाईल ची गरज आहे अशी सूचना शिक्षिका सौ.संगीता रिकामे यांनीकेली.गरजू मुलांना मोबाईल किंवा टॅब देण्याची व्यवस्था स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान मार्फत केली जाईल असेसंतोष जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले.सदर प्रसंगी बंडूकाका जगताप कलाताई फडतरे यांनी मनोगत व्यक्तकेले प्राचार्य हनिफ मुजावरव शिक्षिका सौ.संगीता रिकामे यांनी सत्काराला व विद्यार्थ्यांन मधून  जगताप हिने सत्कारालाउत्तर दिले. सदर प्रसंगी नगरसेविका मंगलनानी म्हेत्रे,माजी नगराध्यश्या कलाताई  फडतरे, संतोष जगताप,बंडुकाका जगताप, सयाजीवांढेकर,धनंजय जगताप,अमोल शिंदे,मनीष रणपिसे,अतुल जगताप,चेतन जाधवराव, निता सुभागडे,कुमुदिनी पांढरे,तृप्तीशिंदे इ.उपस्थित होते अतुल जगताप यांनी आभार मानले.

Read More

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार विलास चाफेकर यांचे निधन

 पुणे वंचित विकास, जाणीव संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे विचारवंत विलास चाफेकर सर यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही

Read More

अबब! गोव्यात दरड कोसळल्याने ट्रेन ढिगाऱ्याखाली

 महाराष्ट राज्यात सध्या सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडाला आहे. अनेक भागांत दरडकोसळून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तर पुरामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यातकोकण रेल्वे मार्गावरही दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. गोव्यामध्ये मंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रेनवरमोठी दरड कोसळली आहे. यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली ही ट्रेन गेली अनेक तास अडकून पडली आहे. याअपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशांना कुलेम येथे माघारी धाडण्यात आले आहे. कर्नाटकमधील मंगळूरहून मुंबईकडे येणारी ही गाडी शुक्रवारी अपघातग्रस्त झालीय. या घटनेचा एक व्हिडिओ आतासमोर येत आहे. ही ट्रेन दुधसागर– सोनोलिम विभागादरम्यान रेल्वे रुळावरून खाली उतरली अशी माहिती समोर येतआहे. ०११३४ मंगळूर जंक्शन–सीएसएमटी एक्स्प्रेस ही ट्रेन अपघातग्रस्त झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोविशेषबाब म्हणजे चिपळूणमधील पुरामुळे या रेल्वे मार्गात बदल करुन ती मडगाव–मिरजमार्गे वळवण्यात आली होती. . दुधसागर आणि सोनोलिम स्टेशनांदरम्यान आणि करंजोल व दुधसागर स्टेशनांदरम्यान दक्षिण–पश्चिम रेल्वेच्या हुबळीविभागादरम्यानच्या घाट विभागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मोठा मातीचा मोठा ढिगारा रुळावरकोसळला. सध्या या भागात वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय ०२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा एक्स्प्रेसचासुद्धा रद्द झालेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे. बुधवारीदिल्ली येथून मार्गत स्त झालेल्या या ट्रेनला लौंडा आणि वास्कोदरम्यान अंशत: रद्द करण्यात आले आहे. तसेच ट्रेननंबर ०८०४८ वास्को द गामा–हावडा एक्स्प्रेस, ०७४२० वास्को द गामा–तिरुपती एक्स्प्रेस आणि ०७४२०/७०२२ वास्कोद गामा तिरुपती हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. मात्र याचा मोठा फटका आता कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे.

Read More

वीर धरणातुन निरा नदीपात्रात २१ हजार ५०५क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग:निरा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा

पुरंदर पुरंदर तालुक्यातील वीर येथील धरणक्षेत्रात गेली तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याचीआवक वाढत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे.शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातुन रात्री आठ वाजता ८०० क्युसेक्सवेगाने निरा नदीपात्रात विसर्ग सुरु झाला होता.शनिवारी पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्गसुरु आहे. वीर धरण विद्युत गृहातुन रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेक्स वेगाने निरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता.रात्री१२:३० वाजता धरणाच्या सांडव्यातुन ४,६३७ क्युसेक्स वेगाने तर पहाटे २:०० वाजता विसर्गाचा वेग वाढवुन १२,४०८क्युसेक्स तर पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गाच्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो व याकाळात नदीकाठच्या रहिवाशांनी काळजीघ्यावी,निरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन निरा पाठबंधारे विभागाकडुन करण्यात आले आहे.

Read More

तालुकास्तरीय शासकीय विद्युत वितरण समिती सदस्यपदी मनोहर कुंजीर

पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील वाघापुर गावचे प्रगतशील बागायतदार व युवा उद्योजक मनोहर कुंजीर यांची पुरंदर तालुका शासकीय विद्युत वितरण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली

Read More

महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद पुरंदरच्या अध्यक्षपदी विनय गुरव, उपाध्यक्षपदी आसिफ मुजावर, सचिवपदी स्वप्निल कांबळे तर कार्यकारिणी सदस्यपदी मंगेश गायकवाड

गुरुपौर्णिमे निम्मीत एस.एम.देशमुखांच्यावर पुष्पवृष्टी पुरंदर :पत्रकारीतेत युट्युब व वेब पोर्टेला वेगळे महत्व आले आहे. या सोशल मिडीयात काम करणाऱ्या युवा पत्रकारांना संघटनेत सामावून घेण्यासाठी राज्यभरात

Read More