पुरंदर पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असणार्या सासवड या गावाशेजारी वसलेले हिवरे गाव. हिवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी रामदास कुदळे यांची
Maharashtra City: पुणे
जेजुरी पोलिसांद्वारे अवैध दारुभट्ट्या उद्ध्वस्त
पुणे जेजूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसलेवाडी आणि राजेवाडी परिसरातील अवैध दारू भट्टयांवर पोलिसांनी कारवाईकेलीय. परिसरातील दारू भट्टयांचा शोध घेऊन थेट पोकलेनद्वारे त्या नष्ट करण्यात आल्यात. या कारवाईत तब्बल 1 हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आलं. याशिवाय भट्टीसाठी वापरली जाणारी लाकडेही जाळून टाकण्यात आलीत. जेजूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसलेवाडी आणि राजेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू भट्टया असल्याचीमाहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत ग्रामस्थांच्याही वारंवार तक्रारी आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीसनिरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दारु भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. शेतकऱ्यांच्या शेतात अवैधपणेटाकलेल्या दारु भट्ट्या थेट पोकलेनच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या. अवैध व्यवसाय करणाऱ्यासह शेतकरी आणि जमीन मालकावरही कारवाई होणार जेजुरी पोलिसांनी अवैध दारु भट्ट्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आणि आजूबाजूच्यापरिसरात अशा भट्ट्या आढळून येत आहेत. याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी अन्यथा संबंधित अवैध व्यवसायकरणाऱ्यासह शेतकरी आणि जमीन मालकावरही कारवाई केली जाईल, असा इशारा जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक सुनिल महाडीक यांनी दिलाय. नागरिकांकडून कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी या कारवाईमध्ये जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार संदिप कारंडे, पोलीस शिपाई प्रविण शेंडे, अमोल महाडीक यांनी सहभाग घेतला. दरम्यान, जेजुरी पोलिसांनी केलेल्या या अनोख्याकारवाईचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तसेच या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी होवू लागली आहे.
कल्पना जाधव यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार
बारामती अनंतशांती बहुउद्देशीय सामाजीक सेवा संस्था कोल्हापुर व कसबा वाळवे महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत राजमाता जिजाऊ पुण्यतिथीच्या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या
सुकलवाडी येथील भुयारीमार्ग पुन्हा जलमय
वाल्हे (ता. पुरंदर) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ, तसेच सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, राख, नावळी अनेक लहान- मोठ्या वाड्या-वस्त्यांवर जाणारा मुख्य मार्गावर असलेले येथील
रामोशी समाजाला न्याय मिळवुन देणार-माजी मंत्री विजय शिवतारे
रामोशी समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा,शिवसेना,भाजप रिपब्लिकन पक्षांसह विविध सामाजिक संघटनेने दिला पाठिंबा सासवड सासवड येथील रामोशी वतनाची शेतजमीन , सर्वे नं. ६१९ / २ / १ ही जमिन क्षेत्र ५ एकर ७आर, सन १९८३ साली सासवड नगरपालीकेने जिजामाता उद्यान या करीता आरक्षित करुन सदर ठिकाणी जिजामाताउद्यान उभारले आहे, तसेच पालखी मैदानाला लागुन सदर भांडवलकर कुटुंबाचे असलेले १६ आर क्षेत्र ही सासवडनगरपालीकेने सदर कुटुंबाला विश्वासात न घेता बळकावले आहे असे या कुटुंबाचे म्हणने आहे व या दोन्ही शेतजमिनीचासदर भांडवलकर कुटुंबाला मोबदला मिळाला नाही त्यामुळे सदर कुटूंबानी सदर जमिन परत मिळावी या मागणीसाठी सासवड नगरपालीके समोर गुरुवार दि. १ जूलै पासुन बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलनाला काल पाचव्या दिवशी सासवड शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला यावेळी लाईवफेसबुक द्वारे माजीमंत्री विजय शिवतारे यांनी मुंबई येथुन भांडवलकर कुटुंबाला पाठींबा देताना रामोशी समाजाच्यान्याय हक्कासाठी वेळप्रसंगी लढा उभारुन सदर कुटुंबाला मदत केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी बोलतानाशिवतारे म्हणाले की नगरपालिकेने किंवा शासनाने भांडवलकर कुटुंबाच्या जमिनीवर आरक्षण टाकुन त्या जागेवर उद्यानउभारले आहे सदर जागेचा मोबदला पिडीत कुंटूबाला मिळणे आवश्यक आहे सदर मोबदला संबंधित कुटुंबाला अथवात्यांच्या वारसाला मिळाला नसेल तर , सदर कुटुंबाला मोबदला मिळवून देण्यासाठी मी व शिवसेना शेवट पर्यंतभांडवलकर कुटुंबा सोबत राहु , वेळ प्रसंगी रामोशी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारेल असे मत ही विजयशिवतारे यांनी व्यक्त केले, तब्येत ठीक नसल्याने मला पुरंदरला येता आले नाही त्यामुळे व्हिडिओ द्वारे सदर पाठींबा देतआहे आपण सर्व महसूल दस्तऐवज फेरफार काढा याबाबत मा. प्रांत साहेब व मा . तहसिलदार साहेब यांना ही आपणाससहकार्य करण्या बाबत सुचना केल्या जातील ,असे ही शिवतारे म्हणाले. सदर आंदोलनाला ,भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यातआला आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाने सदर आंदोलनाकडे काल पर्यंत पाठ फिरवलेली दिसुन येत आहे.याबाबतसंबंधित कुटुंबाशी चर्चा केली असता जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन केले जाईल अशीप्रतिक्रिया आंदोलन कर्त्यांनी दिली आहे, भांडवलकर कुटुंबाच्या वतीने तुकाराम भांडवलकर, गोपाळ भांडवलकर, बबन भांडवलकर, रामदास भांडवलकर, खोमदासभांडवलकर, राजेंद्र भांडवलकर, हरीचंद्र भांडवलकर, विशाल भांडवलकर, वसंत भांडवलकर, आप्पा भांडवलकर, इत्यादींनी सदर चक्री उपोषणात सक्रीय सहभाग घेतला आहे,
नविन ट्रान्सफॉर्मर्स व सिंगल फेज होण्याकरीता अभियंत्यांना निवेदन
पुणे नवीन ट्रान्सफॉर्मर्स व सिंगल फ़ेज़ होण्याकरीता अधिक्षक अभियंता बारामती मंडल विभाग यांना पुरंदर तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य महेश राऊत यांनी नुकतेच निवेदन
बोपगावात दोन वर्षोपासुन तलाठी येत नसल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय दुर करावी : दत्ताञय फडतरे यांची जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे मागणी
पुणे सासवड -कोंढवा मार्गावरिल पुरंदर तालुक्यातील बोपगाव ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन दोन वर्षोपुर्वी मोठ्या उत्साहात पार पडले .परंतु , तेव्हा पासुन तलाठी गावात येवुन कारभार
हरणी येथे बच्चुभाऊ कडू यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लावून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
पुरंदर तालुक्यातील हरणी येथिल महादेव डोंगरावर आज अपंगांचे दैवत माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लावून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या महागाई विरोधात ठिकठिकाणी आंदोलने.
नीरा: आज सोमवार दिनांक ५ जुलै २०२१ रोजी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोको आंदोलन केले जात आहेत.
वन्यप्राण्यांमुळे पिकांचं नुकसान होत असेल तर भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
दिनांक ५/७/२०२१ सोमवार. “आमच्या इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. दरवर्षी रोही, हरणं, रानडुक्कर, माकडं यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. यासाठी मदत मिळावी म्हणून शासनाकडे काय प्रयत्न करावेत?