अबब! गोव्यात दरड कोसळल्याने ट्रेन ढिगाऱ्याखाली

 महाराष्ट राज्यात सध्या सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडाला आहे. अनेक भागांत दरडकोसळून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तर पुरामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यातकोकण रेल्वे मार्गावरही दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. गोव्यामध्ये मंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रेनवरमोठी दरड कोसळली आहे. यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली ही ट्रेन गेली अनेक तास अडकून पडली आहे. याअपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशांना कुलेम येथे माघारी धाडण्यात आले आहे. कर्नाटकमधील मंगळूरहून मुंबईकडे येणारी ही गाडी शुक्रवारी अपघातग्रस्त झालीय. या घटनेचा एक व्हिडिओ आतासमोर येत आहे. ही ट्रेन दुधसागर– सोनोलिम विभागादरम्यान रेल्वे रुळावरून खाली उतरली अशी माहिती समोर येतआहे. ०११३४ मंगळूर जंक्शन–सीएसएमटी एक्स्प्रेस ही ट्रेन अपघातग्रस्त झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोविशेषबाब म्हणजे चिपळूणमधील पुरामुळे या रेल्वे मार्गात बदल करुन ती मडगाव–मिरजमार्गे वळवण्यात आली होती. . दुधसागर आणि सोनोलिम स्टेशनांदरम्यान आणि करंजोल व दुधसागर स्टेशनांदरम्यान दक्षिण–पश्चिम रेल्वेच्या हुबळीविभागादरम्यानच्या घाट विभागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मोठा मातीचा मोठा ढिगारा रुळावरकोसळला. सध्या या भागात वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय ०२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा एक्स्प्रेसचासुद्धा रद्द झालेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे. बुधवारीदिल्ली येथून मार्गत स्त झालेल्या या ट्रेनला लौंडा आणि वास्कोदरम्यान अंशत: रद्द करण्यात आले आहे. तसेच ट्रेननंबर ०८०४८ वास्को द गामा–हावडा एक्स्प्रेस, ०७४२० वास्को द गामा–तिरुपती एक्स्प्रेस आणि ०७४२०/७०२२ वास्कोद गामा तिरुपती हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. मात्र याचा मोठा फटका आता कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे.

Read More

वीर धरणातुन निरा नदीपात्रात २१ हजार ५०५क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग:निरा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा

पुरंदर पुरंदर तालुक्यातील वीर येथील धरणक्षेत्रात गेली तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याचीआवक वाढत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे.शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातुन रात्री आठ वाजता ८०० क्युसेक्सवेगाने निरा नदीपात्रात विसर्ग सुरु झाला होता.शनिवारी पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्गसुरु आहे. वीर धरण विद्युत गृहातुन रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेक्स वेगाने निरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता.रात्री१२:३० वाजता धरणाच्या सांडव्यातुन ४,६३७ क्युसेक्स वेगाने तर पहाटे २:०० वाजता विसर्गाचा वेग वाढवुन १२,४०८क्युसेक्स तर पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गाच्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो व याकाळात नदीकाठच्या रहिवाशांनी काळजीघ्यावी,निरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन निरा पाठबंधारे विभागाकडुन करण्यात आले आहे.

Read More

तालुकास्तरीय शासकीय विद्युत वितरण समिती सदस्यपदी मनोहर कुंजीर

पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील वाघापुर गावचे प्रगतशील बागायतदार व युवा उद्योजक मनोहर कुंजीर यांची पुरंदर तालुका शासकीय विद्युत वितरण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली

Read More

महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद पुरंदरच्या अध्यक्षपदी विनय गुरव, उपाध्यक्षपदी आसिफ मुजावर, सचिवपदी स्वप्निल कांबळे तर कार्यकारिणी सदस्यपदी मंगेश गायकवाड

गुरुपौर्णिमे निम्मीत एस.एम.देशमुखांच्यावर पुष्पवृष्टी पुरंदर :पत्रकारीतेत युट्युब व वेब पोर्टेला वेगळे महत्व आले आहे. या सोशल मिडीयात काम करणाऱ्या युवा पत्रकारांना संघटनेत सामावून घेण्यासाठी राज्यभरात

Read More

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दौंडज मधील विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स पुस्तकांचे वाटप

पुरंदर दौंडज येथील भारती विद्यापीठाचे,  शिक्षण महर्षि डाॅ. पतंगराव कदम विद्यालय, दौंडज मध्ये महाराष्ट्र राज्याचेउपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अजिंक्य भैय्या टेकवडे युवा मंच दौंडजयांचे तर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स च्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. ऑन लाईन शिक्षणासाठी या गावातील ब-याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण घेण्यामध्ये खूपअडचणी येत आहेत या बाबत पालकांकडून सूचना येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन या गावातील माजी विद्यार्थ्यांनीएकत्र येऊन विद्यार्थ्यांना मदत करण्याची खूणगाठ बांधली.या कामी युवा नेते अजिंक्य भैय्या टेकवडे यांनी या कामी खूपआर्थिक सहकार्य केले.  या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी चेअरमन श्री. दिगंबर दुर्गाडे,माजीपरिषद सदस्य श्री. विराजभैय्या काकडे,युवा नेते अजिंक्य भैय्या टेकवडे,विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. संदेश पवार,श्री. हनुमंत पवार, सरपंच सीमा भुजबळ, ग्रा. पं.सदस्य  श्री. विजय फाळके,  मा.चेअरमन अमोल कदम, तालुका उपाध्यक्ष विक्रम,सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण, फाळके,मा. सरपंच  दामुअण्णाकदम,  मा. ग्रा. पं. सदस्य महादेव माने, श्री.  संभाजी आबा कदम,ग्रामसेवक सुनिल माने, नितीन कदम,अशोकहवालदार,काळूराम कदम रूपेश इंदलकर, वरूण भोईटे, शरद जाधव, उमेश इंदलकर, अनिकेत माळवदकर मुख्याध्यापक श्री. सुधाकर गोतपागर सर, श्री. भगवान तुपे सर,श्री. दिलीप निंबाळकर सर, सौ. शोभा काळखैरे मॅडम,  श्री. अमिन तांबोळी सर, माया कचरे मॅडम , श्री. भगवान जगताप, श्री. सुनिल जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जालिंदर घाटे सर यांनी केले.

Read More

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातून बुलट ट्रेन जाणार? विमानतळ नंतर बुलट ट्रेन प्रकल्पाने शेतकरी चिंतेत.

पुरंदर  पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा मुद्धा एकीकडे गाजत असताना बुलेट ट्रेनप्रकल्पासाठी याच भागातील  सहा गावातील जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.याबाबत प्रशासनाकडून मात्र ठोसकाही सांगितले जात नसल्यामुळे या भागातून बुलेट ट्रेन जणार का?अशी चर्चा गावच्या चावडीवर रंगू लागली आहे.   मुंबईहैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन या केंद्र शासनाच्या अती महत्वकांक्षी प्रकल्पाने वेग धरला आहे.महाराष्ट्र,कर्नाटक वतेलंगणा या तीन राज्यातील ७०० किलोमीटर अंतरावरील हजारो गावे यामध्ये बाधित होणार आहे.एकट्या पुणेजिल्ह्यातील ४५  गावातील जागेंचे भूसंपादन करण्यात येणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे.मध्य रेल्वे प्रकल्पाच्यानियोजित मर्गाशेजारच्या दोन हजार फूट रुंदीच्या परिसरातील जमीन धारकांना बोलवून त्यांची माहिती गोळा केली जातआहे.त्यामध्ये त्यांना जामीन द्यायची आहे का? द्यायची असेल तर अपेक्षित किंमत,नोकरी हवी आहे का?जमिनीच्याबदल्यात इतर ठिकाणी जमीन अथवा दुकान असे पर्याय देण्यात आले असून कुटुंबाची तसेच प्रभावित होणाऱ्यापरिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे.   पुरंदर तालुक्यातील वाघापूर,आंबळे,टेकवडी,माळशिरस,राजुरी,पिसे या सहा गावातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागेचेसर्वेक्षण करून ठीक ठिकाणी लवण्यात आलेेले आहेत. पुरंदर प्रशासनाला मात्र या प्रकल्पाबाबत फारशी माहितीनाही,तसेच त्यांचा सहभागही यामध्ये दिसून येत नाही.याच भागातील काही गावांमध्ये विमानतळ प्रकल्प राबविण्याचाप्रयत्न सुरू असल्याने विमानतळ आणि बुलेट ट्रेन या दोन प्रकल्पामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.  केंद्र शासनाच्या बुलेट ट्रेन या प्रकल्पाबाबत अद्याप कोणतीही माहिती आमच्या पर्यंत पोहोचलेली नाही-तहसीलदाररुपाली सरनोबत.

Read More

दौंडज येथील मोफत नेत्रतपासणीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

१५० जणांना चष्म्याचे वाटप : अजित युवा विकास प्रतिष्ठानचा उपक्रम मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने दौंडज

Read More

पुरंदर! आंबळे येथे ६१ वृक्षांचे वृक्षारोपण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ६१ वा वाढदिवस साजरा

पुरंदर पुरंदर तालुक्यातील पुर्व भागात असणार्या आंबळे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतच्या समोर तसेच रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण करुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात

Read More

बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे दर्शन

बारामती प्रतिनिधी कल्पना जाधव काटकर चोपडज,(बारामती) गावच्या परिसरात ग्रामस्थांनी बिबट्या पाहिला! त्याचा फोटो गावातील नागरिकांच्या मोबाईल मध्येवायरल होत आहे.तो बिबट्या असल्याची खात्री पटली असून, सध्या बारामती तालुक्यात पळशी,वाकी, शेंडकर वाडीमगरवाडी,करंजे,चोपडे,पांढर वस्ती भागात बिबट्यांचा वावर असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडज येथील पांढर वस्ती वरील ग्रामस्थांनी बिबट्या मंगळवारी सायंकाळी सहा , सात  च्या सुमारास पाहिले असल्यानेसर्व भयभीत झाले.प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित वनविभागास कळवावे. बिबट्या चा बंदोबस्त लवकर करावा अशीमागणीही ग्रामस्थांनी केली जात आहे दोन दिवसांपूर्वी एका शेतकरी कुटुंबातील शेळी नाहीसी झालीय पंचक्रोशीतील नागरिकांना आपल्या शेतात जाण्याची भिती निर्माण झाली आहे

Read More

जिजामाता विद्यालयाची कु.सुहानी संपतराव कड ९९ टक्के गुण मिळवून प्रथम

मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी. जेजुरी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी या विद्यालयाचा  इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा १०० टक्के निकाल

Read More