अंडरटेकरच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर अक्षय कुमारने दिले असे उत्तर म्हणाला

अंडरटेकरच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर अक्षय कुमारने दिले असे उत्तर म्हणाला

मुंबई : अक्षय कुमारला बॉलीवुडचा खिलाडी म्हणुन संबोधले जाते. कारण खिलाडी हे नाव असलेल्या अनेक चित्रपटात त्याने काम केले त्यामुळे त्याचे नाव खिलाडी पडले. त्याच्या खिलाडी चित्रपटाच्या मालिकेतील एक चित्रपट म्हणजे ‘खिलाडीयो का खिलाडी’. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शानाला 25 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल अक्षय कुमारने या चित्रपटात अंडरटेकरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे खरे ब्रायन ली हे आहे असा खुलासा केला.

अक्षय कुमारच्या या पोस्टवर खऱ्या अंडरटेकरने प्रतिक्रिया देत अक्षय कुमारला खरी फाईट खेळण्याचे आमंत्रण दिले होते. यानंतर खिलाडीचे चाहते अक्षय कुमार काय प्रतिक्रिया देतो याकडे लक्ष देऊन होते. अखेर अक्षय कुमारने त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, ‘भावा पहिले मला माझा विमा बघु दे मग मी तुला कळवतो’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेनंतर हा संवाद इथेच थांबला का खरच पुढे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. काही चाहत्यांनी अक्षय कुमार आणि अंडरटेकर एखाद्या चित्रपटात एकत्र दिसतील असा अंदाज देखील व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *