नीरा-कोळविहीरे गट राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी बापुसाहेब भोर

नीरा-कोळविहीरे गट राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी बापुसाहेब भोर

पुरंदर

कोळविहिरे गावचे माजी सरपंच सर्जेराव उर्फ बापुसाहेब भोर यांची नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गट अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

एक उत्कृष्ट संघटक म्हणुन त्यांची पुर्ण तालुक्यात ओळख आहे. एक शांत,संयमी व निर्णय क्षमता असणारे बापुसाहेब भोर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुढे नेण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात.

पक्षाप्रती असणारी निष्ठा त्यांना या पदापर्यंत घेऊन आली आहे. कोळविहीरे गावचे माजी सरपंच असणारे बापुसाहेब भोर यांनी पारगाव-माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचेदेखील अध्यक्षपद भुषविलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *