नीरा येथे रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया(आंबेडकर)वर्धापन दिन वृक्षारोपन करून  करण्यात आला साजरा

नीरा येथे रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया(आंबेडकर)वर्धापन दिन वृक्षारोपन करून करण्यात आला साजरा

नीरा

नीरा (पुरंदर) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांचा वाढदिवस पिंपळ वृक्षाची लागवड करून करून साजरा करण्यात आला.सध्या वातावरणातील ऑक्सिजनची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून ती वाढवण्यासाठी वड आणि पिंपळ वृक्षांची लागवड अत्यावश्यक असल्याने आम्ही आज 50 पिंपळे वृक्षांची लागवड करीत असल्याचे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी सांगितले

आज (दि२७ जुलै) रोजी नीरा येथील पालखी तळावर प्रातिनिधिक वृक्षारोपण करण्यात आले.तर नीरा येथील कोविड विलागीकरण कक्षातील रुग्णांना जेवण व   फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी

जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे, निरा शहर अध्यक्ष व माजी उपसरपंच कुमार मोरे, चंद्रकांत भोसले, पुरंदर तालुका युवक अध्यक्ष विनोद धेंडे,बापू ढावरे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष,दादा गायकवाड,नाना हेंद्रे ,रफिक शेख,सुनील चव्हाण,अजित जैन ,संजय क्षीरसागर,सोनू वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *