बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे दर्शन

बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे दर्शन

बारामती प्रतिनिधी कल्पना जाधव काटकर

चोपडज,(बारामती) गावच्या परिसरात ग्रामस्थांनी बिबट्या पाहिला! त्याचा फोटो गावातील नागरिकांच्या मोबाईल मध्येवायरल होत आहे.तो बिबट्या असल्याची खात्री पटली असून, सध्या बारामती तालुक्यात पळशी,वाकी, शेंडकर वाडीमगरवाडी,करंजे,चोपडे,पांढर वस्ती भागात बिबट्यांचा वावर असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोपडज येथील पांढर वस्ती वरील ग्रामस्थांनी बिबट्या मंगळवारी सायंकाळी सहा , सात  च्या सुमारास पाहिले असल्यानेसर्व भयभीत झाले.प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित वनविभागास कळवावे. बिबट्या चा बंदोबस्त लवकर करावा अशीमागणीही ग्रामस्थांनी केली जात आहे दोन दिवसांपूर्वी एका शेतकरी कुटुंबातील शेळी नाहीसी झालीय पंचक्रोशीतील नागरिकांना आपल्या शेतात जाण्याची भिती निर्माण झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *