पुणे जिल्हा हादरला!  मुलीला संपवण्याची धमकी देऊन “या” गावातील महिलेवर अत्याचार;तीन जणांवर गुन्हा दाखल

पुणे जिल्हा हादरला! मुलीला संपवण्याची धमकी देऊन “या” गावातील महिलेवर अत्याचार;तीन जणांवर गुन्हा दाखल

पुणे

पती, मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार केला असून याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.त्यानुसार गुरु दोडमणी ( २५), मयुर ( २६), दीपक काटकर ( २४, सर्व रा.लिपाणे वस्ती, सदगुरु हॉस्पिटलमागे, आंबेगाव खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

२३ वर्षीय पीडित महिला, पती, लहान मुलगीसह आंबेगाव परिसरात राहायला आहेत. आठ महिन्यांपूर्वी आरोपी दोडमणी महिलेचा पती घरात नसताना गेला. महिलेचा पती आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या महिलेने याची माहिती कोणाला दिली नाही.

त्यानंतर आरोपी दोडमणीने महिलेला धमकावून पुन्हा बलात्कार केला.
दोडमणीचे मित्र मयूर आणि दीपक हेही महिलेच्या घरी गेले. तुझी बदनामी करेन, अशी धमकी आरोपींनी तिला दिली. महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने अखेर आंबेगाव ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *