कितीही रक्कम मागा,आपण लगेच मंजूर करू,सरकारचा पैसा आहे,आपल्या बापाचं काय जातंय;सरकारमधील “या” मंत्र्यांच वादग्रस्त वक्तव्य

कितीही रक्कम मागा,आपण लगेच मंजूर करू,सरकारचा पैसा आहे,आपल्या बापाचं काय जातंय;सरकारमधील “या” मंत्र्यांच वादग्रस्त वक्तव्य

पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारल्यानंतरही महायुती सरकारमधील मंत्र्यांची वादग्रस्ते थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि विधिमंडळा पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रीपद सोडावे लागल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या एका वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

संजय शिरसाट यांच्या हस्ते अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे झाले. यावेळी बोलताना त्यांनी “सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय” असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते.

संजय शिरसाट यांनी याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतोय. तुम्ही जास्त बोलू नका नाहीतर तुमचेही आमच्यासारखे हाल होतील असा सल्ला शिरसाटांनी मिटकरींना दिला.मात्र आता शिरसाटांच्याच वक्तव्याचीच चर्चा जास्त रंगली आहे.

राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्‍यांच्या वक्तव्यावरुन सध्या काही मंत्री अडचणीत सापडले होते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याकडून नुकतंच कृषि खातंही काढून घेण्यात आले आहे, त्यांना कोकाटे यांची क्रीडामंत्री पद देण्यात आले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत सर्वच मंत्र्यांना मोजूप मापून बोलण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना नाव घेता सुनवाले होते. मात्र आता शिरसाटांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *