पुरंदरमधील मोठी बातमी!!!!!   तालुक्याच्या “या” गावातुन पसतीस वर्षीय विवाहित तरुण बेपत्ता;माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

पुरंदरमधील मोठी बातमी!!!!! तालुक्याच्या “या” गावातुन पसतीस वर्षीय विवाहित तरुण बेपत्ता;माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

पुणे

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या गावातुन मंगेश लवांडे हे बेपत्ता झाल्याची भाग्यश्री मंगेश लवांडे, वय 33 वर्षे,  रा.सिंगापुर ता पुरंदर जि.पुणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्री लवांडे यांनी सासवड पोलीस स्टेशनला  हजर राहून खबर दिली की, मी वरील ठिकाणी माझे पती  मंगेश,सासु जनाबाई, सासरे प्रकाश, मुलगी मृन्मयी,मुलगा स्वरुप  असे एकत्रात राहणेस असुन पती  शेती करून उपजीविका करतात.
     
दिनांक 27/07/2025 रोजी दुपारी 04:00 वा चेसुमारास  माझे पती मंगेश हे घरातील किराणा माल घेवुन घरी आले व माल घरात ठेवुन काहीएक न सांगता घरातुन कोठेतरी बाहेर गेले.माझे पती राञी उशीरा घरी यायचे.मला मायग्रेनचा ञास असल्याने मी राञी गोऴ्या खावुन झोपले होते.त्यानंतर पहाटे मला जाग आल्याने मी पाहीले असतापती मंगेश हे घरी आले नव्हते.

त्यामुऴे मी त्यांचे मोबाईलवर फोन केला असता फोन बंद लागला.त्यानंतर सकाळी उठल्यानंतर देखील पती मंगेश यांचे मोबाईलवर फोन केला असता फोन बंदच लागत होता.त्यामुऴे मी माझे चुलत दीर तुषार कैलास लवांडे यांना फोन केला व पती मंगेश बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की,मंगेशची कार ही भोरवाडी येथे आपले शेतामध्ये गोडावुन जवऴ लावलेली आहे.चावी आत गोडाउन मधे ठेवलेली आहे असे सांगितले.

त्यानंतर मी माझे पति मंगेश यांनी फोन लावला असता त्यांचा फोन स्वीच ऑफ लागत होता त्यानंतर माझे दिर सौरभ लवांडे याना फोन करुन सांगितले.त्यांनी  पति मंगेश यांचे मित्र व नाते वाइक याचा कडे विचार पुस केली असता काहीएक माहीती मिळली नाही. त्यानंतर दि.27/07/2025 रोजी राञी 11:20 वा चे सुमारास गावातील ग्रामपंचायत सीसीटीव्ही मधे त्याची पंच कार पार्क केलेली दिसत होती तसेच भोरवाडी ता.पुरंदर जि. पुणे .येथील शिवशक्ती हॉटेल चे  सीसीटीव्ही माझे दिर सौरभ लवांडे यांनी चेक केले असता त्यामधे  दि. 28/07/2025 रोजी पहाटे 05:30 वा  चे सुमारास आमची कार शेतामधे पार्क करुन पति रस्त्याने चालताना दिसले परंतु ते अध्याप पर्यंत घरी न आल्याने ते मिसींग झाल्याचे आमची खात्री पटल्याने आज रोजी आम्ही सासवड पोलीस ठाणे येथे मिसींग देणे करिता आलो.माझे मिसींग झालेल्या पतिंचे वर्णन खालील प्रमाणे…..

वर्णन – मंगेश प्रकाश लवांडे, वय 35 वर्ष,  व्यवसाय-शेती, रा.सिंगापुर ता पुरंदर जि.पुणे.रंग गोरा,उंची 5 फुट 8 इंच,केस-काळे,बांधा -मध्यम,नेसणीस-पांढरे रंगाचा फुल शर्ट,काऴे रंगाची फॉरमल पँट पायात-पांढरे रंगाचा शुज,भाषा मराठी
बोलतात जर कोणाला काही माहिती असल्यास सासवड पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *