पुरंदर तालुक्यातील “या” गावात शाळेच्या इमारतीत घुसला ट्रक;शाळेचे मोठे नुकसान तर चालक गंभीर जखमी

पुरंदर तालुक्यातील “या” गावात शाळेच्या इमारतीत घुसला ट्रक;शाळेचे मोठे नुकसान तर चालक गंभीर जखमी

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील रासकर मळा शाळेच्या इमारतीला ट्रकने जोरदार धडक दिली असुन शाळेचे मोठे नुकसान झाले असुन यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.

रस्ता रुंदीकरणामध्ये हा रस्ता पूर्णपणे शाळेच्या जवळून अगदी संरक्षक भिंतीला लागूनच जात आहे.तर संरक्षक भिंतीचे कामही अर्धवट आहे.येथे रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर जमिनीचा ताबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आला मात्र याच्या बदल्यामध्ये काही तांत्रिक अडचण सांगत जागेचा अथवा इमारतीचा अद्यापपर्यंत एक रुपयाचा मोबदलाही देण्यात आलेला नाही.

याबाबत ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार अथवा प्रत्यक्ष भेटून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे मोबदला मिळाला तर संरक्षक भिंतीचे काम करता येऊ शकते ही बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या वतीने याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

तरी आजची घटना व या घटनेचे गांभीर्य पाहून तरी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे तर शिक्षण विभागानेही या बाबीकडे लक्ष देत यासाठी पाठपुरावा करणे व मुलांच्या सुरक्षितेचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत येथील पालक व्यक्त करीत आहेत.यापूर्वी सेंट्रो गाडीने सुरक्षा भिंतीला धडक दिल्याने भिंत पडली आहे. हा अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने मोठा अनर्थ टळला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *