पुणे जिल्ह्यातील “या” गावात गणपतीचे दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव डंपरने उडवले,दोघांचा जागेवर मृत्यू;आठच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

पुणे जिल्ह्यातील “या” गावात गणपतीचे दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव डंपरने उडवले,दोघांचा जागेवर मृत्यू;आठच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

पुणे

हिट अँड रनच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. दररोज या घटना समोर येत आहे. त्यातच मुळशी तालुक्यामधून पुन्हा एकदा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. गणपती दर्शन घेऊन घरी जात असताना एका भरधाव वेगात असलेल्या डंपर चालकाने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरात धडक दिल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी अशी मृत्यू पावलेल्या पती-पत्नींची नावे आहेत. मुळशी तालुक्यातील भूकंप परिसरामध्ये हा अपघात घडला आहे. अपघात घडल्यानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला आहे. अनिल आणि प्रिया यांचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनिल सूर्यवंशी आणि प्रिया सूर्यवंशी हे दाम्पत्य रात्री उशिरा गणपती पाहिल्यानंतर आपल्या दुचाकीवरून भूगाव वरून भुकूमकडे चालले होते.

त्याचवेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून एक डंपर चालक भरधाव वेगाने जात होता. या डंपरची या पती-पत्नीच्या दुचाकीला जोरात बसली. पती-पत्नी दोघेही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. मात्र डंपर चालकाने घटनास्थळी न थांबता तिथून पळ काढला. त्यामुळे या पती-पत्नींना उपचार न मिळाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

अनिल सूर्यवंशी व प्रिया सूर्यवंशी खाजगी कंपनीमध्ये कामाला होते. मित्रांबरोबर गणपती पाहायला ते आले होते. मात्र काळाच्या मनात काही वेगळेच होते. या दाम्पत्याचे गणपतीचे दर्शन हे अखेरचे ठरले.

त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या मित्र परिवारावर व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *