दु:खद !!!!!!!    बहिणीला व्हिडिओ कॉल अन् भावाची रेल्वेपुलावरुन उडी, रक्षाबंधनपूर्वी आयुष्याचा धागा तुटला

दु:खद !!!!!!! बहिणीला व्हिडिओ कॉल अन् भावाची रेल्वेपुलावरुन उडी, रक्षाबंधनपूर्वी आयुष्याचा धागा तुटला

पुणे

अलीकडे युवा पिढीमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे, असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहराजवळ घडला आहे. आपल्या बहिणीला अखेरचा फोन करून रेल्वे पुलावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळी घटना घडली आहे. रक्षाबंधनच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी बहिणीला फोन करून जीवन यात्रा संपत असल्याची माहिती त्याने दिली. या घटनेमुळे बहिणीलाही मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र राजेंद्र कीर (वय, ३८) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो रत्नागिरीतील मुरुगवाडा परिसरात वास्तव्यास होता. दरम्यान सुरेंद्र याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सायंकाळी ही घटना घडली आहे.

मडगावकडून मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस समोरच त्या युवकाने रेल्वे पुलावरुन उडी घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहराजवळील डी मार्ट येथील रेल्वे पुलावरून उडी घेत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१५ ऑगस्ट २०२४) संध्याकाळी घडली हा सगळा प्रकार समजतात याप्रकरणी घटनास्थळी रत्नागिरी पोलीस व नागरिकांनी धाव घेतली.

याप्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी रत्नागिरी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची माहिती मिळताच तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक निखारर्गे, शिवगण, हवालदार मंदार मोहिते, हवालदार रुपेश भिसे, हवालदार रोशन सुर्वे, अजय कांबळे आदी पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मृतुदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने पोलिसांना मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले. याप्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. संबंधित तरुणाने आत्महत्या का केली, तसेच आत्महत्येपूर्वी त्याचे बहिणीसोबत नेमके कोणत्या विषयावर बोलणे झाले, याबाबतही पोलीस माहिती घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *