पुणे जिल्हा हादरला!!!!! बहिणीला नेलं म्हणून दाजी संतापला; “या” गावात दुकानात घुसुन मेव्हण्यावर कोयत्याने वार करत कापली मान

पुणे जिल्हा हादरला!!!!! बहिणीला नेलं म्हणून दाजी संतापला; “या” गावात दुकानात घुसुन मेव्हण्यावर कोयत्याने वार करत कापली मान

पुणे

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उरण, नाशिकनंतर आता पुणे जिल्ह्यातही हत्येची घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे भरचौकात असलेल्या एका दुकानदाराचा कोयत्याने सपासप वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली.बहिणीच्या पतीनेच भावाची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

दाजीने मेव्हण्याचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास खामगाव गावातील गाडीमोडी चौकात ही घटना घडली आहे.सुरज राहुल भुजबळ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमोल बहिरट असे आरोपीचे नाव आहे.सूरजने बहिणींना घरी आणले म्हणून चिडलेल्या दाजीने अमोल बहिरट याने त्याचा खून केला.

वर्दळीच्या चौकात असलेल्या दुकानात घुसून आरोपीने सूरजवर कोयत्याने १५ ते १६वार केले. त्याने मानेसह, पायावर व पोटावर वार केले. या हल्ल्यात सूरजची मान कापली गेली व तो जागीच गतप्राण झाला.

हत्येचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *