पुणे
शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गॅस सिलेंडर योजनेचे लाभ घेण्यासाठी सासु सुनांनी कागदपत्री वेगवेगळं राहण्याचा महिलांना अजब सल्ला दिला आहे.
अर्जुन खोतकर म्हणाले, एका परिवारासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 सिलेंडर जाहीर केलेत, मात्र तुम्ही थोडी हुशारी करा, सासू सूना वेगवेगळ्या रहा फक्त कागदपत्री म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर वाढवून मिळतील असा अजब सल्ला दिला आहे. जालना येथे गायरान हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेला मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती यावेळी केलेल्या भाषणात अर्जून खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना उद्देशून हा खोचक आणि अजब सल्ला दिला आहे.