पुणे
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे. लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता लाडकी बायको योजना आणा असं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.
नाशिक येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.जयंत पाटील म्हणाले की, ”देश हा भाजपच्या विरोधात आहे. सर्व सामान्य लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात नकारात्मक भूमिका आहे.आजच्या बजेटमधून महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही.
निव्वळ तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले. ठोस योजना नाही याची खंत आहे. राज्य सरकार आज भेदरलेल्या अवस्थेत आहे. मतं मिळवायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता लाडकी बायको योजना आणा”. असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.