पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा! “या” गावातील दिव्यांग मावळ्याची राजगडावर चढाई;भर पावसात बिकट वाटेने केला गड सर

पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा! “या” गावातील दिव्यांग मावळ्याची राजगडावर चढाई;भर पावसात बिकट वाटेने केला गड सर

पुणे

दिव्यांगत्वावर मात करीत छत्रपती शिवरायांवरील निस्सीम भक्ती- पोटी पंकज महादेव जगताप या पुरंदरच्या मावळ्याने सोमवारी (दि. ८) भर पावसात राजगड (वेल्हे) तालुक्यातील दुर्गम राजगडावर चढाई केली.

आबंळे (ता. पुरंदर) येथील पंकज जगताप (वय २४) हा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. तो वडिलोपार्जित शेती करतो तसेच गावात छोटे किराणा दुकानही चालवतो. पंकजने पाल खुर्द येथील शिवकालीन राजमार्गाने सकाळी साडेसात वाजता गडावरील चढाईला सुरुवात केली. डोंगर, कडेकपारीतील बिकट पायी मार्गाने तसेच निसरड्या पायऱ्या खडकांतुन दोन्ही हातांच्या साह्याने त्याने अडीच तासांत गड सर केला.

या वेळी आंबळे येथील शुभम ताडगे व ऋषिकेश जगताप त्याच्या सोबत होते.अतिबिकट खडकांतून चढाई करताना मित्रांनी त्याला साथ देऊ केली. मात्र, पंकजने कोणाचीही साथ न घेता खडक, उंच पायऱ्यांवर हात टेकत जिद्दीने चढाई करीत सकाळी दहा वाजता तो गडाच्या पाली दरवाजात पोहचला. तेथे पायरीवर माथा टेकून पंकजने छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

राजगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राजसदरेत किल्ल्याचे पाहरेकरी बापू साबळे, सुरक्षारक्षक विशाल पिलावरे, आकाश कचरे आदींनी ‘हर हर महादेव’, ‘जय शिवराय’च्या जयघोषात पंकजचे स्वागत केले.

पंकजने गड सर केल्याबद्दल पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुमित जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *