सुसंस्कृत समाज घडविण्याची जबाबदारी समाजाची:ॲड विजय भालेराव

सुसंस्कृत समाज घडविण्याची जबाबदारी समाजाची:ॲड विजय भालेराव

सासवड

तालुका विधी सेवा प्राधिकरण, सासवड व सासवड बार असोसिएशन यांचे संयुक्त विदयमाने मा. मुख्य मध्यस्थी केंद्र, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे, शनिवार दिनांक ०६/०७/२०२४ रोजी सकाळी ९.१५ वाजता मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.म.ताहेर बिलाल साहेब, प्रमुख न्यायाधीश तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, श्रीमती. एस. के. देशमुख, श्री. महेश भरड, सह दिवाणी न्यायाधीश हे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी गुलाबाचे रोप देवून केले. कार्यकमाचे सुत्रसंचालन प्रा. श्वेता फडतरे यांनी केले.

कार्यकमाचे प्रास्ताविक अँड. प्रकाश खाडे यांनी केले, त्यांनी मध्यस्थी जनजागृती कार्यकमाची माहिती दिली, लैगिंक गुन्हयापासून मुलाचे संरक्षण या विषयांवर अँड. विजय भालेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बालकांचे हित साधन्याचे काम कायदयाने केले आहे व सुसंस्कृत समाज घडविण्याची जबाबदारी समाजाची असल्याचे त्यांनी विशद केले. समाजानेच मुलांना सुसंस्कृत घडवावे असे अवाहन केले. मध्यस्थी एक दुवा या विषयांवर अँड . महेश बारटक्के यांनी मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त तंटे हे मध्यस्थीव्दारे आपआपसात मिटवावेत असे त्यांनी अवाहन केले. मध्यस्थी हा दोन घटकामधील एक महत्वाचा दुवा असल्याचे त्यांनी विशद केले.

यावेळी प्रमुख न्यायाधीश श्री. ताहेर बिलाल साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. कायदा हा प्रत्येकाच्या जिवनात महत्वाचा असून त्याचा सदुउपयोग व्हावा हे त्यांनी विशद केले. तसेच विदयार्थ्यांनी पुस्तकातील अनुक्रमणिका वाचून उपयोग नसून संपूर्ण पुस्तक वाचावे असे त्यांनी उपस्थितांना अहवाहन केले. विदयार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग कुंटूब, देशहित, समाजहित व समाजातील गरीब मुलांच्या हितासाठी उपयोग करावा असे अवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात श्रीमती. एस. के. देशमुख यांनी कायदयाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून आपला अधिकार बजावताना दुस-याच्या अधिकाराची पायमल्ली करु नये असे त्यांनी अवाहन केले. मुलांनी आपल्या कुंटूबासोबत आई वडीलांकडे आपले मन मोकळे करावे, चूकीची गोष्ट माहिती असेल तर ती चूकीची गोष्ट विदयार्थ्यांनी करु नये असे अवाहन त्यांनी केले.

यावेळी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण, उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार, महाविदयालयाच्या कायदेशीर सल्लागार अँड . कलाताई फडतरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. बाबासाहेब पिलाणे, राहूल कोलते, मधुकर झिजुरके, दशरथ घोरपडे, सतीश राणे, उमेश आगवणे, दत्तात्रय फडतरे, व्यंकटेश बोरकर, रामदास भोसले, आदी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन कॉलेजचे प्रशासन अधिकारी संजय रोकडे व तालुका विधी सेवा समितीचे वरीष्ठ लिपीक परशुराम देशमुख यांनी कले. अँड, गणेश उरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *