पुरंदर तालुक्यातील “या” गावात दारू पार्टीत मग्न झालेल्या तळीरामांनी पैशाच्या वादातून आपल्याच मित्राचा केला निर्घूणपणे खून

पुरंदर तालुक्यातील “या” गावात दारू पार्टीत मग्न झालेल्या तळीरामांनी पैशाच्या वादातून आपल्याच मित्राचा केला निर्घूणपणे खून

पुणे

पुरंदर तालुक्यातील वाल्हे हद्दीतील एका परमिट रूम अँड बिअरबारच्या कॉटेज जवळ दारू पार्टीत मग्न झालेल्या तळीरामांनी पैशाच्या वादातून आपल्याच मित्राचा निर्घूणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार ( दि.१४ मे ) रोजी रात्री ९ च्या सुमारास पवन संभाजी शेलार ( वय २३ रा.पिंगोरी ) व त्याचे मित्र तुषार शरद यादव तसेच विकास अर्जुन भोसले ( दोघे रा.पिंगोरी ) व अविनाश आत्माराम पवार ( रा.आडाचीवाडी ) यांच्या समवेत वाल्हे हद्दीतील एका परमिट रूम अँड बिअरबारच्या कॉटेज जवळ दारू पित बसले होते.

त्यावेळी पैशाच्या कारणास्तव वाद निर्माण झाल्याने तुषार यादव विकास भोसले व अविनाश पवार या तिघांनी मिळून पवन शेलार याला मातीच्या विटांसह दारूच्या बाटलीने अमानुषपणे मारहाण केली.यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी पवन शेलार याला उपचारासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले .परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते.मात्र उपचारादरम्यान पवन शेलार याचा मृत्यू झाला आहे .

याबाबतची फिर्याद ईश्वरी संभाजी शेलार ( रा.बारसुडे नगर जेजुरी ) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.तर या घटनेतील आरोपी विकास भोसले व अविनाश पवार यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी तुषार यादव हा फरार झाला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास आय.पी.एस.अधिकारी दर्शन दुगड तसेच जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *