Big Breaking!!!!!पक्ष प्रमुख अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव करूनच आपण पक्ष सोडणार;अजित पवारांना खुलं आव्हान…..

Big Breaking!!!!!पक्ष प्रमुख अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव करूनच आपण पक्ष सोडणार;अजित पवारांना खुलं आव्हान…..

पुणे

माळशिरस येथील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी खुद्द राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख अजित पवारांनाच खुलं आव्हान दिले आहे.पक्ष प्रमुख अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव करूनच आपण पक्ष सोडणार असं मोठं विधान ही जानकर यांनी केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वेळापूरच्या सभेत बोलताना जानकरांनी हे विधान केले आहे.

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांचा बारामतीमध्ये पराभव करूनच पक्ष सोडणार आहे असं मोठं विधान‌ माळशिरसचे उत्तम जानकर यांनी केले आहे. मी माझाच पक्षात राहणार आहे, मी काय पक्ष सोडणार नाही.बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना निवडून आणल्याशिवाय मी या पक्षातून हटणार नाही.

आमच्या पक्ष प्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढील निर्णय घेऊ असं ही जानकर म्हणाले.अजित पवारांनाच खुलं आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.‌ यावर राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडेच लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *