हृदयस्पर्शी !!!!!!   पुरंदर तालुक्यातील “या” गावच्या पाटलांनी भागवली मुक्या प्राण्यांची तहान

हृदयस्पर्शी !!!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावच्या पाटलांनी भागवली मुक्या प्राण्यांची तहान

पुरंदर

सध्या सर्वत्र प्रचंड उन्हाळा सुरू असुन पावसाअभावी वनक्षेत्रात असणारे सर्वच पाणवठे पूर्णतः कोरडे पडले आहेत या पार्श्वूभुमीवर सासवड येथील स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानने वन्य प्राण्यांच्यासाठी सामाजिक भावनेतून कोरड्या पडलेल्या पाणवठ्यात पाणी सोडून त्यांची तहान भागवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले होते.

त्याला प्रतिसाद देत परिंचे गावचे पाटील हिम्मतराव जाधव यांनी त्यांचे चिरंजीव विक्रम सिंह जाधव व निलम जाधव यांच्या नुकत्याच झालेल्या विवाहाप्रित्यर्थ हरणी वन विभागात असलेल्या पाणवठयात टँकरद्वारे पाणी सोडून स्तुत्य काम केले आहे. आज (शुक्रवारी) येथील कोरड्या पडलेल्या पाणवठयात सुमारे पाच हजार लिटर पाणी सोडण्यात आले.

स्वतः विक्रमसिंह जाधव यांच्या समवेत विजय जाधव,भरत नवले, स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, अंकुर शिवरकर, सलील महाराज जगताप, हेमंत ताकवले आदी उपस्थित होते.

जाधव या कुटुंबाचा आदर्श घेत इतरांनी देखील या उपक्रमाला हातभार लावत मुक्या प्राण्यांची तहान भागवून सामाजिक कार्य करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संतोष जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *