पुरंदर
पुरंदर तालुक्यातील येथील सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान ऐवज चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, चक्क आपल्या आजीच्या डब्यातून या सोन्याच्या मौल्यवान वस्तू नातीनेच चोरुन नेल्याचे घटना समोर आली आहे.
या प्रकरणी आजी लिलावती लक्ष्मण मुळीक वय ७५ वर्षे रा.गुळुंचे ता.पुरंदर जि.पुणे यांनी नात पल्लवी विजय मुळीक हिच्याविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.दि. 12/11/2023 ते 17/3/2024 या काळात राहत्या घरातुन वेळोवेळी आजीच्या डब्यातुन मौल्यवान वस्तू गायब होत होत्या. पण त्या चोरी कोण करतय याचा काही पत्ता या आज्जीबाईला लागला नाही.
मात्र काही दिवसांनी चोर हा घरातलाच निघाला आहे. या चोरीमध्ये एक सोन्याचा गंठन १ तोळा, एक आक्कासाहेब सोन्याचे डोरले, कानातील सोन्याचे टाँप, सोन्याच्या रिंगा, एक सोन्याची अडीच तोळे वजनाची मोहनमाळ, सोन्याची नथ, पायातील जोडवी, सोन्याचे मणी, चांदीचे पैजण,
सोन्याची पोत इत्यादी एकूण 1 लाख 90,000 रूपये किंमतीचा मौल्यवान ऐवज मिळून आला आहे.
याप्रकरणी आरोपी नात पल्लवी विजय मुळीक रा गुळुंचे ता. पुरंदर जि.पुणे हिच्यावर जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मदने हे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.