मोठी बातमी !!!!!!विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला; देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश

मोठी बातमी !!!!!!विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला; देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश

पुणे

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला असून दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याची माहिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत ही समेट घडवून आणल्याचं कळतंय. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतल्या नेत्यांमधील वाद आता जवळपास संपुष्टात आला आहे.

आज विजय शिवतारे पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर बारामतीत नणंद-भावजय अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. 

त्यातच बारामती मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीही अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. अजित पवार उर्मट असल्याचं सांगत बारामतीत पवारांविरोधात उमेदवारी अर्ज भरणारच असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे बारामतीत लोकसभेची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.दरम्यान, विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी बैठक घेत चर्चा केली होती.

पण, यानंतरही विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत आपण १ एप्रिलला प्रचाराला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली.विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांचं टेन्शन वाढलं होतं. शिवतारे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कारवाई केली पाहिजे, असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलं होतं.

अशातच बुधवारी (ता. २७) पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवास्थानी चर्चा केली.यावेळी अजित पवार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची देखील उपस्थिती होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या समेट घडवून आणण्यास देवेंद्र फडणवीसांना यश आल्याचं कळतंय. आज विजय शिवतारे पत्रकारपरिषद घेऊ आपली भूमिका मांडणार असून ते बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय मागे घेऊ शकतात, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *