पुणे
पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा घाटात आधिराज्य गाजवणारा सप्तहिंदकेसरी मन्या बैलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. खेड तालुक्यातील वाफगाव येथे मन्या बैलाचा आज दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने मन्या बैलाचे चाहते येथे उपस्थित होते.प्रत्येकाच्या डोळ्यात मन्याच्या आठवणीने अश्रू तरळले.
मन्या बैलाने बैलगाडा शर्यतीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.मन्या बैलाने खेड तालुक्यात आपल्यासह आपल्या मालकाचंही नाव मोठं केलं आहे. यासह मन्या बैलाने मालकाला मोठी संपत्ती देखील कमावून दिली आहे.
मन्या बैलाने जिंकलेल्या बक्षिसांचा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.मन्या बैलाने अनेक शर्यतीत बाजी मारली. यामध्ये मन्या बैलाने जेसीबी, कार, बाईक, सोनं, रोख रक्कम अशी कोट्यवधींची बक्षिसे पटकावली आहेत. या बक्षिसांची यादी भलीमोठी आहे.
बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिलं नाव मन्या बैलाचंच निघतं. न हरणार योद्धा अशी ओळख मन्याने निर्माण केली होती.मन्या बैलाच्या आठवणीत त्याच्या दशक्रिया विधीच्या दिवशी नवीन गाणं देखील करण्यात आलं आहे. मन्याचा पुतळा साकारणार असल्याची भावना देखील त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
.जे सी.बी – 1
• पिकअप – 2
• ट्रॅक्टर – 3
• बोलेरो – 3
• स्कॉर्पिओ – 1
• थार – 1
• बुलेट – 79
• मोटर सायकली – 150
• सोने – 100 तोळे
• एक कोटी रूपयांपेक्षा जास्त रोख रक्कम