पुरंदर पंचायत समितीचा टँकर अखेर गावात दाखल;माजी सरपंचांच्या प्रयत्नांना आले यश

पुरंदर पंचायत समितीचा टँकर अखेर गावात दाखल;माजी सरपंचांच्या प्रयत्नांना आले यश

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या आंबळे गावात गेल्या महिन्याभरापासून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत ने वारंवार पंचायत समितीची पत्रव्यवहार केला होता. परंतु काही कारणानी पंचायत समितीकडून आंबळे गावासाठी टँकर मिळत नव्हता. गावात पाण्यासाठी ग्रामस्थांचे अतोनात हाल होत होते.

त्या अनुषंगाने आंबळे गावचे माजी सरपंच मंगेश गायकवाड यांनी पंचायत समितीत वारंवार पाठपुरावा केला होता. काल दिनांक 26/2/2024 रोजी आंबळे गावचे माजी सरपंच मंगेश गायकवाड यांनी पंचायत समितीतील पाणीपुरवठा अधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी उद्या कसल्याही परिस्थितीत आंबळे गावात पाण्याचा टँकर येईल अशी ग्वाही दिली होती व आज त्या ग्वाहीचे रूपांतर टँकर मध्ये झाल्याच दिसत आहे.

आज दिनांक 27/2/2024 रोजी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचा पाण्याचा टँकर उशीरा का होईना आंबळे गावात पोहोचला. गावात टॅंकर आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून पुरंदर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे आंबळे ग्रामस्थांकडून आभार मानण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *