पुणे हादरलं !!!!!! पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून केला खुन;नंतर झाडाला गळफास घेत संपवले जीवन

पुणे हादरलं !!!!!! पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून केला खुन;नंतर झाडाला गळफास घेत संपवले जीवन

पुणे

पुण्यात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीनं असं पाऊल का उचललं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक-बे परिसरात ही घटना घडली आहे. सोमनाथ सखाराम वाघ आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख यांनी दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती- पत्नी रविवारी दुचाकीवरून घरातून बाहेर पडले होते.

उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात आले. त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत दुचाकी उभी केली. ते दोघे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलात गेले. त्या ठिकाणी पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला. तिची हत्या केली. त्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला.

दरम्यान, सकाळी ११ वाजून गेले तरी ते घरी परत आले नाहीत.हे पती पत्नी दुसऱ्या दिवशीही घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटु लागली. त्यामुळे त्यांची मुलगी व पुतण्याने त्यांचा शोध घेतला. सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात दिसली. त्या परिसरात शोध घेतला असता मुलीला आईचा मृतदेह आढळला. तर वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचं दिसून आलं.

या घटनेची माहिती त्यांनी उत्तमनगर पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक युसूफ शेख तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता चौरे, सहाय्यक फौजदार प्रसाद जोशी, कर्मचारी धनंजय बिटले‌ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास करण्यास सुरूवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *