सुकलवाडी येथील भुयारीमार्ग पुन्हा जलमय

सुकलवाडी येथील भुयारीमार्ग पुन्हा जलमय

वाल्हे (ता. पुरंदर) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ, तसेच सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, राख, नावळी अनेक लहान- मोठ्या वाड्या-वस्त्यांवर जाणारा मुख्य मार्गावर असलेले येथील रेल्वेगेटभुयारी मार्ग मंगळवार (दि.६) दुपारी झालेल्या मुसळधार पाऊसाने पुन्हा जलमय झाल्याने, येथील ग्रामस्थांमधून व प्रवाशीवर्गातून, रेल्वे प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे.

थोडाजरी पाऊस झाला तरी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून, सुकलवाडी तसेच पालखी तळ, व अनेक वाड्या-वस्त्यांवर जाणा-या मुख्य मार्गावरील, रेल्वे गेट भुयारी मार्गात पाणी साचून राहते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेचे सदस्य प्रवीण शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या पुणे मंडलचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सोबत बुधवारी (दि. 9 जुन) रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, बैठकीमध्ये रेल्वे अधिकार्‍यांनी आंबळे, राजेवाडी, बेलसर, पिसर्वे, नायगाव, धालेवाडी येथील स्थानिक निवडक नागरिक, पदाधिकार्‍यांबरोबर चर्चा करण्यातआली. स्थानिक नागरिक व पदाधिकार्‍यांकडून सुचवण्यात आलेल्या पर्यायांवर सविस्ततर चर्चा करण्यात आली होती.

वाल्हे येथील सुकलवाडी फाटा येथील रेल्वेच्या भुयारी मार्गात येथून पुढच्या काळामध्ये नागरिकांची कोणतीही गैरसोयहोणार नाही, याची ग्वाही देण्यात आली होती. या बैठकीस रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकसहर्ष बाजपेयी, मध्य रेल्वे विभागीय अभियंता नजिबउल्ला शेख, डीआएम पुणेचे सचिव मिलिंद वाघोलीकर, पुणे जिल्हाबँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते, पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकरावझेंडे, सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, नायगावचे सरपंच हरिदास खेसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुरंदर तालुकाअध्यक्ष संदेश पवार, प्रा. संतोष नवले.

दरम्यान, यावेळी बैठकीत, भुयारीमार्गातील पाणी करंजनाला येथील ओढ्यामध्ये ड्रेनेज लाइनच्या माध्यमातून सोडण्यातयावे असे स्थानिकांनी सुचविले आले होते . तसेच येत्या १० दिवसांमध्ये भुयारीमार्ग परिसरातील जागेचे सर्वेक्षण करून, यासर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे प्रशासन व वाल्हे ग्रामपंचायतीस सादर करून, लवकरात-लवकर प्रत्यक्षात कामाला सुरुवातहोईल. असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी या भुयारीमार्गाची पाहाणी करूनरेल्वे प्रशासन सुचण्या दिल्यावर खासदारांच्या दौऱ्यांच्या दुस-यांच दिवशी सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात करण्यात आलीहोती. मात्र या सर्वेक्षणाचा अहवाल प्रत्यक्षात अजून वाल्हे ग्रामपंचायतीस रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाला नसून, फक्तसर्वेक्षण करून पुढील कामे मात्र अजूनपर्यंत तरी प्रलंबितच आहेत. तसेच जोपर्यंत ड्रेनेजलाइनचे काम पूर्णत्वास जात नाहीतोपर्यंत येथे २४ तास पाणी काढण्यासाठी मोटर पंपाची सोय करणार असल्याचे यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यातआले; मात्र प्रत्यक्षात रेल्वे प्रशासनाकडून सांगितल्या प्रमाणे येथे मोटर पंप बसविण्यात आला. तसेच येथे २४ तासकर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र , मंगळवार ( दि.६) दुपारी अचानक मुसळधार पाऊस झाल्याने पुन्हाएकदा भुयारीमार्ग जलमय झाला. रेल्वे प्रशासनाकडून बसविण्यात आलेला पंप नादुरुस्त झाला असल्याने, भुयारीमार्गातील पाणी साचून राहिल्याने, अनेक वाहनचालकांना साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने, दुचाकी वाहनातपाणी जाऊन बंद पडली असून, येथील प्रवाशांना पुन्हा, रेल्वे प्रशासनामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेप्रशासनाने लवकरात- लवकर भुयारी मार्गाचा प्रश्‍न सोडवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *