सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांनी मुंबईत घेतला शेवटचा श्वास

सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांनी मुंबईत घेतला शेवटचा श्वास

मुंबई 

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, महान अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिलाचित्रपट.त्यानंतर राम और श्याम, देवदास, गंगा जमुना, नया दौर, मुघल-ए-आझम अशा चित्रपटात त्यांनी अजरामरभूमिका केल्या होत्या. ते खऱ्या अर्थाने पहिले ‘सुपरस्टार’ होते. 

त्यांना आदर्श मानणारे अनेक कलाकार नंतर पुढे आले. ते जणू अभिनयाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्यानिधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टी व कलाविश्वात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. हा एका युगाचाअंत आहे. असे जाणकार सांगतात 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *