ऋतुराज गायकवाडचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वविक्रम ! असा विक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज

ऋतुराज गायकवाडचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वविक्रम ! असा विक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज

पुणे

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील शेवटचा सामना जिंकत भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांमध्ये ५५.७५ च्या सरासरीने २२३ धावा केल्या आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मार्टीन गप्टीलच्या नावे होता.

आता ऋतुराजने गप्टीललाही मागे सोडलं आहे. गप्टीलसह ऋतुराजने विराट कोहली आणि डेवोन कॉनव्हे यांनाही मागे सोडलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

ऋतुराज गायकवाड -२२३ धावा

मार्टिन गप्टील – २१८ धावा

विराट कोहली – १९९ धावा

डेवोन कॉनव्हे – १९२ धावा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *