पुण्यातील धक्कादायक प्रकार! बुरखा घालून प्रेयसीला भेटण्यासाठी शाळेत गेला;मुलं चोरणारा समजुन लोकांनी त्याला लय बदडला

पुण्यातील धक्कादायक प्रकार! बुरखा घालून प्रेयसीला भेटण्यासाठी शाळेत गेला;मुलं चोरणारा समजुन लोकांनी त्याला लय बदडला

पुणे

अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तिच्या शाळेत बुरखा घालून गेला. परंतु त्याचा हा जुगाड कामी आला नाही. परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. बघता-बघता लहान मुले पळवणारी टोळी आली अशी अफवा परिसरात पसरली. काहींनी या तरुणावर हात साफ करुन घेतला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

यामुळे तरुणाची मोठी फजिती झाली. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात असलेल्या इंदिरानगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. विजय अमृत वाघारी असं अटक करण्यात आलेल्या प्रियकराचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विजयचे आदर्श इंदिरानगर परिसरातील शाळेमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. दोघेही एकमेकांना भेटून फिरण्यासाठी जात होते. काही दिवसांनी दोघांच्या प्रेमाची कुणकुण त्यांच्या कुटुंबियांना लागली.

कुटुंबियांनी दोघांनाही समज देऊन एकमेकांना भेटण्यासाठी मज्जाव केला. प्रेयसीला भेटता येत नसल्याने विजय वेडापिसा झाला होता. म्हणून त्याने बुरखा घालून तिच्या शाळेत जाण्याचा प्लान आखला. मात्र, त्याचा हा प्लान फसला. मुलं चोरणाऱ्या टोळीचा मेंबर समजून परिसरातील नागरिकांनी त्याला चोपून काढलं. तसेच पोलिसांच्या ताब्यात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *