पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या आंबळे गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कृष्णा मंगेश गायकवाड या विद्यार्थ्याच्या चित्रकलेवर संबंध शाळा व ग्रामस्थ आता भारावून गेलेत कारण या अवलियाने असे चित्र काढल की जे चित्र पाहून चांगल्या चित्रकारालाही त्यापुढे झुकावच लागेल.
आंबळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारा विद्यार्थी कृष्णा मंगेश गायकवाड या चिमुकल्या विद्यार्थ्याने कार्टून नेटवर्क मधील बेन टेन या कलाकृतीचे थोडक्यात वर्णन हे म्हणण्यापेक्षा त्याचे हुबेहुब चित्र आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून साकारले आहे.
त्या चिमुकल्याची ही कला पाहताना असं वाटतं की मोबाईल मधून किंवा कॅमेरा मधून फोटो काढलाय व तोच फोटो प्रिंट करून त्या कागदावर लावलाय इतकी हुबेहुब प्रतिमा या चिमुकल्याने काढली या चित्रकलेला व चिमुकल्याला संजीवनी न्यूज चा त्रिवार सलाम.
हे चित्र काढण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री जगताप व सहशिक्षक कैलास वारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आंबळे गावच्या मा.ग्रामपंचायत सदस्या संजीवनी विनायक गायकवाड यांचा नातू तसेच आंबळे ग्रामपंचायतचे मा.सरपंच मंगेश विनायक गायकवाड यांचा कृष्णा हा मुलगा आहे.