सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघ सोडणार? वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार?

सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघ सोडणार? वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार?

पुणे

सध्या महाराष्ट्राचा राजकारणात खूप काही विचित्र गोष्टी घडत असताना सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्धा दौऱ्यावर असताना वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मला आवडेल असे भाष्य केल्याने सुप्रियाताई सुळे या वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न सध्या तयार होत आहे.

पहा काय म्हणतात सुप्रियाताई सुळे

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtube.com/shorts/fq4_MCLVKt0?si=K3BOjE3bEkNrz3UP

फक्त पक्ष संघटनेने जर सांगितलं तर या ठिकाणी लोकांची सेवा करण्यास मला नक्कीच आनंद होईल असं विधान सुप्रियाताई सुळे यांनी केल्याने सर्व महाराष्ट्रात तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात तर्कवितर्क लावले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी सुनेत्राताई पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू असताना सुप्रियाताई सुळे यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडला का? अशाच प्रकारचा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

आता नेमकं कोण कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *