पुणे
सावकाराकडून पैसे घेतले असल्याने ते परत मिळावे यासाठी सावकाराचा सातत्याने तगादा सुरु होता. सावकाराच्या जाचाला कंटाळून ३३ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना धुळ्यात घडली आहे.
यानंतर शिक्षकाचे नातेवाईक आक्रमक झाले असून पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे.आनंदा रतन चव्हाण (वय ३३) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शिक्षकाचे नाव आहे. आनंदा चव्हाण यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते.
हे पैसे परत घेण्यासाठी सावकाराचा तगादा सुरु होता. सावकारांनी पैशांसाठी संबंधित युवा शिक्षकास त्रास दिल्यानेच शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा नातेवाईकांचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
युवा शिक्षकाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ व नातेवाईक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. संबंधित सावकारांस जोपर्यंत पोलीस ताब्यात घेऊन कठोरात कठोर शासन होत नाही; तोपर्यंत निजामपूर पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यावर संतप्त नातेवाईक ठाम होते.
तसेच निजामपूर पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांनि रास्ता रोको सुरू केला असून पोलीस प्रशासनातर्फे मृताच्या नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे.