पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या श्री क्षेत्र भुलेश्वर या मंदिराच्या लगत ढगात चक्क गणेशाच्या मूर्तीचे दर्शन झाले आहे. हा अद्भुत नजारा भुलेश्वर पाटी ते भुलेश्वर मंदिर मध्ये असणारे खूपटे वस्ती या ठिकाणाहून काढलेल्या दुर्मिळ फोटोत आभाळात ढगांमध्ये चक्क गणेशाची मूर्ती असल्याचे जाणवते. निसर्गाच्या या अद्भुत नजर्याला नेमके काय म्हणावे.
सध्या पूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असताना श्री क्षेत्र भुलेश्वराच्या दर्शनाला गणपती बाप्पा अवतरले की काय असेच सध्या पहावयास मिळत आहे.
सध्या हा फोटो जोरदार व्हायरल होत असुन संजीवनी न्यूज या फोटोची पुष्टी करीत नाही.